ताज्या घडामोडी
युवाशक्तीचा भाजपमध्ये प्रवेश! अंबाजोगाईच्या मिलिंद नगरमधील तरुणाईचा श्री. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या नेतृत्वावर विश्वास!
अक्षय जोगदंड. प्रतिनिधी अंबाजोगाई अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 11, मिलिंद नगर येथील अनेक उत्साही युवक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते श्री. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या खंबीर नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मिलिंद नगरमधील युवकांनी 'ओन्ली काकाजी' असा निर्धार व्यक्त करत हा निर्णय घेतला असून, भाजपच्या युवाशक्तीला यामुळे मोठे बळ मिळाले आहे. या युवा कार्यकर्त्यांनी केला प्रवेश: पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये रोहन भैय्या कोकाटे, राहुल ओव्हाळ, मोसिन भैय्या पठाण, विकास मस्के, कृष्णा बनसोडे, आदित्य गायकवाड, अभिषेक गायकवाड, गोकुळ ढोबळे, आणि अमन कोकाटे यांचा समावेश आहे. या सर्व तरुणांनी एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याने मिलिंद नगर प्रभागातील पक्षाची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. यावेळी श्री. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांनी या सर्व युवा कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या येण्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.




