ताज्या घडामोडी

अशोक भाऊ गंडले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, शैक्षणिक साहित्य व राशन किट वाटपासारख्या उपक्रमांची रेलचेल — जनतेच्या मनातला ‘भाऊ’ झाला सेवाभावाचा प्रतीक.

अंबाजोगाई : ( भरारी न्युज ) अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुलकीचं स्थान मिळवलेले आणि सामाजिक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणारे अशोक भाऊ गंडले यांचा ४५ वा वाढदिवस अंबाजोगाई शहरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सेवाभावाच्या ध्येयाने साजरा होत आहे. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, राशन किट वितरण आणि रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांची मालिकाच आयोजित करण्यात आली आहे. हा उपक्रम येत्या रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई येथील ब्लड बँक येथे पार पडणार आहे. “रक्तदान हीच जीवनदानाची खरी साधना” या भावनेने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक सहभागी होणार असून, या निमित्ताने अनेक रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व गोरगरिबांना राशन किट देऊन अशोक भाऊ गंडले यांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा आदर्श ठेवला आहे. अंबाजोगाई शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात “भाऊंचा वाढदिवस” साजरा करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्याच्या बळावर आणि प्रहार संघटनेच्या माध्यमातून जनतेचा लाडका चेहरा बनलेले अशोक भाऊ गंडले यांनी आतापर्यंत शेकडो सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे असंख्य निराधारांना मदतीचा हात मिळाला असून, त्यांच्या कार्यशैलीतून “सामाजिक जबाबदारी म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर कृतीतून दाखवणे” हा संदेश समाजाला मिळतो. अशा या धडाकेबाज, जनतेच्या मनातील, आणि सेवाभावाचा ध्यास घेतलेल्या अष्टपैलू कार्यकर्त्याचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा होत असल्याने अंबाजोगाई शहरभर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचे अमूल्य योगदान शेतकऱ्यापासून ते सीमावरील जवानांपर्यंत अनेकांच्या जीविताचे रक्षण करणारे ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमात सहभागी होणे हे प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, असा संदेश देखील या निमित्ताने दिला जात आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!