ताज्या घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज

बीड – भरारी न्युज बीड जिल्ह्यात सध्या निवडणुकांचे वातावरण तापत असताना आता नवीन राजकीय पर्याय म्हणून स्वराज्य शक्ती सेना या संघटनेची भर पडली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे अध्यक्ष नवनाथ हरे यांनी भरारी न्यूजशी बोलताना दिली. संस्थापक अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वराज्य शक्ती सेना सहभागी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधून आपली उमेदवारी निश्चित करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नवनाथ हरे आणि संस्थापक अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंडे यांनी केले आहे. स्वराज्य शक्ती सेनेचे उद्दिष्ट गोरगरीब जनतेच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा देणे हे असून, जनतेमधून या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीसाठी इच्छुक व्यक्तींनी आपल्या सामाजिक कार्याचा तपशील, जनहिताचे उपक्रम आणि भविष्यात राबविणाऱ्या योजनांचा आराखडा स्वराज्य शक्ती सेनेकडे सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. उमेदवाराचे व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि समाजातील कार्याचा आलेख विचारात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून करुणाताई धनंजय मुंडे आणि जिल्हाध्यक्ष नवनाथ हरे यांनी बीड जिल्ह्यात मजबूत जनाधार निर्माण केला असून, येत्या काळात सर्व स्तरावरील निवडणुकांमध्ये सेनेचे उमेदवार विजयी ठरतील, असा ठाम विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!