ताज्या घडामोडी

“ग्रामीण भागातील माणूस हा आर्थिक साक्षर झाला पाहिजे ” — युवा सरपंच शिवराज भुमरे

पाचोड: शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड आणि प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पीएम उषा अंतर्गत एकदिवसीय "राष्ट्रीय क्षमता संवर्धन "कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत "आर्थिक शिक्षणाद्वारे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सक्षक्तीकरण" कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाचोड चे सरपंच शिवराज भैय्या भुमरे हे उपस्थित होते. त्यांनी अर्थशास्त्रीय विचार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे तसेच ग्रामीण भागातील माणूस हा आर्थिक साक्षर ही झाला पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. विलास खंदारे यांनी देखील आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. अर्थशास्त्रीय ज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून आर्थिक ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी सिक्कीम येथील केंद्रीय विद्यापीठयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रंगलाल मोहपात्रा यांनी या कार्यशाळेमध्ये ऑनलाइन मार्गदर्शन केले. मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. सोनाजी पतंगे यांनी ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण'या संदर्भात आपले मत व्यक्त केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. विश्वनाथ कोकर यांनी साधन व्यक्ती म्हणून आपले मत व्यक्त केले आणि डॉ.पांडुरंग कल्याणकर यांनी दुपारच्या सत्रामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांनी जागतिक अर्थकारणावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर टेक्निकल सेशनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय शिवाजीनगर छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. डॉ. पंडित नलावडे आणि डॉ. प्रशांत देशमुख यांनी साधन व्यक्ती म्हणून आपले मत व्यक्त केले. समारोपाच्या सत्रामध्ये अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने यांनी' भारतीय अर्थव्यवस्था' आणि जागतिक पातळीवर होणारे बदल यावर प्रकाश टाकला. मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ.अर्जुन मोरे हे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवा संस्था पाचोड चे अध्यक्ष श्री राजू नाना भुमरे साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर ,शेतमजूर हा आजही आर्थिक बाबी मध्ये साक्षर झालेला दिसत नाही. त्यांच्या प्रगतीसाठी अशा कार्यशाळेची फार गरज आहे. आर्थिक विकासामध्ये शेवटच्या घटकाचा विचार होणे महत्त्वाचे आहे. या क्षमता बांधनी कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. शिवाजी यादव, डॉ. संदीप सातोणकर, डॉ. दीपक भुसारे डॉ.सुभाष राठोड यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील डॉ. गांधी बानायत डॉ. विलास महाजन, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. हेमंतकुमार जैन, प्रा. विनोद कांबळे, डॉ. हरिप्रसाद बिडवे, प्रा. अरूणा दसपुते यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. या राष्ट्रीय क्षमता संवर्धन प्रोग्राम साठी 72 प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि सेवक, विद्यार्थी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!