ताज्या घडामोडी
*फार्मसी महाविद्यालयात एड्स/ एच.आय.व्ही विषयक जनजागृती शिबिर संपन्न*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी. फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एच.आय.व्ही/एड्स विषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर आयोजित करण्यातचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये एच.आय.व्ही./एड्सविषयी जनजागृती , वैज्ञानिक माहिती, सामाजिक संवेदनशीलता आणि प्रतिबंधात्मक उपायांची जाणीव निर्माण करणे हे होते. या शिबिराचे उद्घाटन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तरके , प्रदीप जिरे (समुपदेशक , ICTC), विश्वास लवंदे यांच्या उपस्थिती मध्ये तथा अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आपल्या प्रास्ताविक पर मार्गदर्शनात प्राचार्य तरके यांनी समाजातील गैरसमज दूर करून एच.आय.व्ही./एड्सबाबत जागरूकता वाढविण्याचे महत्त्व सांगितले.प्रमुख वक्ते प्रदीप जिरे (समुपदेशक, ICTC) आणि विश्वस लवंद (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लवंद यांनी प्रयोगशाळा तपासणी, रक्तनमुने हाताळताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षा व नियमांचे निराकरण केले. तर जिरे यांनी एच.आय.व्ही./एड्सचे लक्षणे, संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय आणि समाजातील कलंक नष्ट करण्याची गरज स्पष्ट केली. शिबिरातील प्रश्नोत्तर सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला . या दरम्यान विद्यार्थ्यांनी आपापले गैरसमज दूर केले. शेवटी प्रा. मंदार चौधरी, कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले व युवकांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सहानुभूती आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. असेच आरोग्य विषयक शिबिरे वारंवार आयोजित करण्याची भावना निर्माण झाली होती.




