ताज्या घडामोडी

शिंदे भावंडांची कुस्तीतील धमाकेदार कामगिरी — विभागीय स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक

होळेश्वर विद्यालयाचा डंका! राहुल व ऋतुजा शिंदे विभागीय कुस्ती स्पर्धेत विजेते — राज्यस्तरावर निवड छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी बनेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी राहुल हनुमंत शिंदे आणि कुमारी ऋतुजा हनुमंत शिंदे यांनी विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. दिनांक 7 ते 8 ऑक्टोबरदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये कुमारी ऋतुजा शिंदे (46 किलो वजन गट) हिने प्रथम क्रमांक, तर राहुल शिंदे (92 किलो वजन गट) यानेही प्रथम क्रमांक मिळवत दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आगामी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा खोपोली येथे होणार असून दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल श्री होळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य मलदोडे सर, बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष भागवतदादा गोरे, प्राध्यापक भैय्यासाहेब सरवदे, बालासाहेब खोगरे, राम कदम, रत्नपारखे सर, बर्डे सर, एम.एम. केंद्रे मॅडम, देशमुख मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी राहुल व ऋतुजाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!