ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत होळगावचा यशवंत शिंदे विजेता

होळ प्रतिनिधी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये होळगावचा पैलवान यशवंत बाळासाहेब शिंदे (इयत्ता अकरावी, श्री होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय) याने 51 किलो वजन गटात बीड जिल्ह्याचे विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे यशवंतची निवड विभागीय स्तरावरील 51 किलो वजन गट ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. यशवंतच्या कामगिरीबद्दल त्याचे तालमीतील कोच, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. बर्डे सर, विवेकानंद विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. नागरगोजे सर तसेच होळ येथील ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच होळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री. मलदोडे देवानंद संभाजीराव, प्राध्यापक सरवदे सर, बालासाहेब खोगरे सर, बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष भागवतदादा गोरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यशवंतच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!