ताज्या घडामोडी

*राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त बी. फार्मसी महाविद्यालयात स्वच्छता अभियान यशस्वी*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- बी फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण आणि प्रभावी वातावरणात पार पडले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आयोजनात स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमात प्रा. मंदार चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत सांगितले की स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असावी असे सांगितले. तर प्राचार्य डॉ. संतोष तरके यांनी स्वच्छतेचा शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक शिस्तशी असलेला थेट संबंध स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सतत स्वच्छतेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले. स्वयंसेवकांना गटांमध्ये विभागून महाविद्यालय परिसर आणि आजूबाजूच्या जागा स्वच्छ करण्याची जबाबदारी दिली गेली. त्यांनी गवत, कचरा आणि धूळ साफ केली तसेच प्लास्टिक, कागद व इतर नष्ट न होणाऱ्या वस्तू वेगळ्या करून योग्य व्यवस्थापन केले. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावली गेली, परिसरातील भिंती व फलकांवर स्वच्छतेबाबत संदेश लिहून जागरूकता निर्माण केली गेली. अभियानाचा समारोप करत प्रा.मंदार चौधरी यांनीस्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. स्वच्छता अभियान हा केवळ एकदिवसीय उपक्रम नसून ती आयुष्यभर अंगीकारण्याची सवय असावी असे अधोरेखीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व स्थानिक नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले व भविष्यात अधिक व्यापक पातळीवर असे अभियान राबविण्याची ग्वाही दिली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली तर स्थानिक समुदायालाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. ज्यामुळे स्वच्छ, निरोगी आणि जबाबदार समाज घडविण्यास हातभार लागण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!