ताज्या घडामोडी
*संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरसकट एकरी 50 हजार रूपये मदत करा अन्यथा अंबाजोगाईत रूमण -तिरडी मोर्चा* *काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांचा इशारा*
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला असून यामुळे शेतकर्याच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जमिनी खरडुन गेल्या आहेत. त्यांना तात्काळ 50 हजार एकरी मदत करा अन्यथा अंबाजोगाईतील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी दिला आहे सरकारने ढगफुटी असणार्या मंडळामध्येच मदत जाहिर केली आहे. परंतु अंबाजोगाई तालुक्यामध्ये ढग फुटी सदृष्य वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे खरीपाचे पिक वाहुन गेले आहे. खरीपाचे पिक वाहून गेले, जमीन खरडुन गेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांना ही जमीन कसण्यासाठी किमान 50 हजारांची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने एकरी 50 रूपयांची मदत करावी अशी मागणी शेतकर्यातून होत आहे.तसेच अंबाजोगाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा,नुकसान ग्रस्त शेतकर्यांची कृषी कर्ज व इतर कर्ज सरसगट माफ करावेत, आणि शेतकर्यांना सरसकट विमा मंजुर करावा, पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या व मृत्यू मुखी पडलेल्या जनावरांच्या पंचनाम्याची अट शिथील करून त्यांना तातडीने मदत करावी अन्यथा अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर रूमण तिरडी मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे अंबाजोगाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी दिला आहे
