आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हरित बीड अभियानांतर्गत न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण – ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग

अंबाजोगाई : श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई आणि जिल्हा प्रशासन बीड तसेच वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी ‘हरित बीड अभियान’ राबविण्यात आले. ‘संकल्प एका दिवसात ३० लक्ष वृक्षांचा’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या विशेष मोहिमेत न्यू व्हिजन पब्लिक स्कूलने सक्रिय सहभाग नोंदवला. शाळेचे प्राचार्य श्री एम. प्रशांतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नववीतील विद्यार्थ्यांनी साकूड (ता. अंबाजोगाई) परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमात सहशिक्षक श्री प्रिंन्सीड सर, श्री पांडे सर, सौ. जयंती मॅडम आणि सौ. सुचिता दहिफळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. वनपाल विजया शिंगटे यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे कार्य यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आत्मियता निर्माण झाली असून, त्यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची शपथ घेतली. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सचिव श्री राजकिशोरजी मोदी, कार्यकारी संचालक श्री संकेतभैया मोदी, मार्गदर्शक श्री चंद्रकांत गायकवाड सर, श्री बी. आय. खडकभावी सर आणि श्री चव्हाण सर यांनी शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले. न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे भान निर्माण होऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!