आपला जिल्हाताज्या घडामोडी
बिजभांडवल योजना व थेट कर्ज योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करावेत
बीड, दि,13 (जिमाका):- राज्यातील इतर मागासवर्गीय सर्वागिण कल्याणासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि या महामंडळा अंतर्गत विविध इतर मागास प्रवर्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केलेल्या असून बीड जिल्हास्तरावरील कामकाज कार्यन्वित करण्यात आलेले असून या महामंडळ व उपकंपन्या मार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 20 टक्के बिज भांडवल कर्ज योजना, रु. 1.00 लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वंयसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकूण सहा योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वंयसिध्दी व्याज परतावा योजना या पुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असून इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबपोर्टवर आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. उर्वरीत बिजभांडवल योजना व थेट कर्ज योजना ह्या ऑफलाईन स्वरुपाच्या असून त्याचे अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.याबात अधिक माहितीकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहासमोर, बीड-नगर रोड, बीड दुरध्वनी क्रमांक 02442-232624 या पत्यावर संपर्क साधावा, असे अवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक बी.एस. भोसले बीड यांनी केले आहे.




