आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केज येथे कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धेचे आयोजन

केज /प्रतिनिधी दिनांक३१ जुलै रोजी केज येते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने भव्य आणि दिव्य मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे अनेक वर्षानंतर केज येथे स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत केज शहरातील सांस्कृतिक चळवळ ही बऱ्याच वर्षापासून बंद पडलेली होती परंतु कला क्रीडा विश्व समिती च्या वतीने संगीत क्षेत्राचा वारसा पुढे चालवण्याचं काम करत आहे या कार्याला केज शहरातून नव्हे तर मराठवाड्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व कला क्रीडा विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे केज शहरातील नागरिकांतून कौतुक ही होत आहे ही स्पर्धा दुपारी २ वाजता मुक्ताई फंक्शन हॉल येथे होणार आहेत तेव्हा या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आव्हान राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संलग्न कला क्रीडा विश्व समिती केज च्या वतीने करण्यात येत आहे या स्पर्धेसाठी संगीत क्षेत्रातील तज्ञ असे परीक्षक नेमले गेलेले आहेत परीक्षकांचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय राहील या स्पर्धेमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन गट केलेले आहेत यामध्ये पुरुष गटा साठी मोहम्मद रफी यांचेच गीत स्पर्धेमध्ये स्वीकारले जातील तर महिलांमध्ये खुल्या स्पर्धा होतील यामध्ये लता मंगेशकर आशा भोसले किंवा इतर कुठल्याही गायिकेचे गाणे या स्पर्धेमध्ये गाऊ शकतात प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ असे स्पर्धक निवडले जातील यामध्ये पुरुष आणि महिला यांच्याकरिता समान बक्षीस ठेवले आहेत प्रथम रोख रक्कम बक्षीस ५००१, द्वितीय३००१, तृतीय२००१ व उत्तेजनार्थ १००१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संपर्क करिता ९८६०४४४७१८,८६९८५६६४१४, या नंबर वरती संपर्क करावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!