आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

*राशन घोटाळ्यातील होळच्या उपसरपंचाला भाजपकडून सरचिटणीसपदाची बक्षिसी! केजच्या आमदारांचे पती, तालुकाध्यक्षांनी राशन माफियाचा केला पक्ष पदाने गौरव!*

केज (प्रतिनिधी) दि.१९ : तालुक्यातील राशन घोटाळ्यातील होळच्या उपसरपंचाला भाजपकडून सरचिटणीसपदाची बक्षिसी दिल्याने नेतृत्वाच्या नैतिकतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ६ दिवसांपूर्वीच राशन घोटाळा चव्हाट्यावर आलेला असून गंभीर आरोप असलेल्या बाळासाहेब घुगे यांना आमदारांचे पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा, तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या नेतृत्वाखाली केजचे तालुका सरचिटणीस पद देऊन गौरव केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. होळचे उपसरपंच बाळासाहेब घुगे यांच्या अध्यक्षतेखालील कोलंबस सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानातून त्यांचा भाऊ अशोक घुगे याच्यामार्फत तब्बल ४४ क्विंटल राशन काळ्या बाजारात विक्रीस गेल्याचा गैरप्रकार धारूर पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला. याप्रकरणी धारूर पोलिसांनी तालुका पुरवठा विभागास पत्र देत धान्य नमुने तपासणीसाठी घेतले असून, केज पुरवठा कार्यालयाने केल्या तपासणीत ४९ किलो तांदूळ कमी तर १ क्विंटल ९ किलो गहू जादा आढळल्याचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे कारवाईसाठी पाठवला आहे. हा राशन घोटाळा सध्या केज तालुक्यातील चर्चेचा विषय बनलेला असताना भाजपच्या आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तालुका कार्यकारिणीत बाळासाहेब घुगे यांना भाजप केज तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करून बक्षीस देण्यात आली आहे. या अंबाजोगाईत शनिवारी झालेल्या नियुक्ती कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, मंडळ अध्यक्ष भगवान केदार, तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, गैरव्यवहार स्पष्ट असतानाही केलेल्या या नेमणुकीमुळे भाजप नेतृत्वाच्या नैतिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. *कारवाई होऊ नये म्हणून यंत्रणेवर दबाव कोणाचा हे आता स्पष्ट झाले-विजय केंद्रे* केज तालुक्यातील गोरगरिबांचे हक्काचे राशन काळ्या बाजारात विकले जात असतानाही घोटाळेबाजांवर कारवाई करण्याऐवजी पक्ष पदांनी गौरव करण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या नेतृत्वाची नैतिकता समोर आली आहे. तसेच, राशनच्या गैरप्रकाराबाबत सर्वकाही पुरावे स्पष्ट असतानाही कारवाई होऊ नये म्हणून यंत्रणेवर दबाव कोणाचा होता हे आता सांगण्याची कोणालाही आवश्यकता नाही, ते स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया राशन घोटाळ्यातील तक्रारदार आणि भगवान बाबा युवा सेनेचे अध्यक्ष विजय केंद्रे यांनी दिली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!