आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे विद्यार्थी परिषद निवडणूक* उत्साहात पार पडली
अंबाजोगाई . भरारी न्युज. . आज दिनांक २८ जून २०२५ रोजी *श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल,* अंबाजोगाई येथे विद्यार्थी परिषद निवडणूक अत्यंत लोकशाही पद्धतीने व उत्साही वातावरणात पार पडली. या निवडणुकीत इयत्ता १० वी च्या वर्गातील हेड बॉय पदासाठी *हर्षराज देशमुख आणि शिवेंद्रसिंह कणसे* यांच्यात चुरशीची लढत झाली. तसेच हेड गर्ल पदासाठी *कु. आरोही पवार, कु. ज्ञानेश्वरी ढगे, कु. इशिका कांबळे, कु. तनिष्का दामा व कु. मारिया काझी* या विद्यार्थिनींनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली. या विद्यार्थी परिषदेमध्ये *क्रीडा मंडळ, सांस्कृतिक मंडळ, शिस्तमंडळ* , तसेच शाळेतील *रेड, ब्लू, येलो व ग्रीन* या चार ग्रहांच्या प्रमुख आणि उपप्रमुख पदासाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी एकूण *६३* विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या मतदानात इयत्ता ६ वी ते १० वीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मतदार म्हणून सहभाग होता. सर्व वर्गांचे वर्गशिक्षक बूथ प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मतदान केंद्र निरीक्षक म्हणून श्री. जयशंकर त्रिपाठी यांनी भूमिका पार पाडली, तर निवडणूक अधिकारी म्हणून श्री. प्रिन्सी डी कार्यरत होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे आयुक्त म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. एम. प्रशांतकुमार यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची, जबाबदारीची आणि नेतृत्वगुणांची शिकवण मिळाली. शाळेने अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेत या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमधे लोकशाहीची मूल्ये रुजवण्यात मदत झाली . या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची पारदर्शक माहिती दिली . या उपकमासाठी संस्थेचे संस्थापक सचिव श्री. राजकिशोर मोदी , कार्यकारी संचालक श्री संकेत मोदी , मार्गदर्शक श्री चव्हाण सर , मार्गदर्शन श्री थोरात सर , मार्गदर्शक श्री बी.आय. खडकभावी यांनी सहभागी विद्यार्थी (उमेदवार , मतदार ) यांचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या .




