आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई येथे रक्तदान शिबीर संपन्न
अंबाजोगाई/ प्रतिनिधी - स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई येथे रक्तदान शिबीराचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी 35 जणांनी रक्तदान केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या वर्धापन दिनानिमित अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अंबाजोगाई शहरातील आणि आशिया खंडातील सर्वात मोठं असलेल्या सस्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात होत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत शाखा व्यवस्थापक सुयश कुमार व बैंक कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातुन आयोजित रक्तदान शिबीरात तब्बल 35 जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन यमपली शागिरी (चिफ मॅनेजर आर ए सी सी)व राजेश गुप्ता (मैनेजर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात शाखेचे अधिकारी सुयश कुमार (शाखा व्यवस्थापक), विकास नाळे (मॅनेजर) विनय सोनवणे, अक्षय कुलकर्णी, विश्वजित हातागळे यांनी सहभाग घेतला.यावेळी तालुक्यातील ग्राहक, शेतकरी, नागरिक, कर्मचारी उपस्थित होते. या बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयोजित रक्तदान शिबिरात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.




