आपला जिल्हामहाराष्ट्र
गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटी वर सिंचन साधने मिळण्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करावेत
बीड, दि. 23 (जि. मा. का.):- २०२४-२५ अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटी वर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत. तसेच कडधान्य मध्ये बीज प्रक्रिया ड्रम (seed treatment drum), पौष्टिक तृणधान्य अंतर्गत pulveriser व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र( Dibbler), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील (Seed drill), छोटे तेल घाणा सयंत्र (oil extraction unit ) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत. सदर बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. Mechanization व Irrigation या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी, २०२५ असेल. तरी, जास्तीत जास्त शेतक-यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक / जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
