आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योगेश्वरी परिसरातील निर्णयाचा परिणाम – आराधी महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

भरारी न्युज. 9156101056..अंबाजोगाई: श्री योगेश्वरी देवी मंदिराच्या मुकुंदराज रोडवरील प्रवेशद्वाराजवळ नियंत्रण सुटलेल्या टेम्पोने एका वृद्ध आराधी महिलेचा जीव घेतला. बुधवारी (दि. २२) दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत केसरबाई धोंडीराम जोगदंड (वय ६५, रा. परळी वेस, समता नगर, अंबाजोगाई) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरबाई योगेश्वरी मंदिराजवळील प्रवेशद्वाराजवळ बसल्या होत्या. मंदिर परिसरातील एका कार्यक्रमासाठी खुर्च्या व इतर साहित्य वाहून नेण्यासाठी टेम्पो (एमएच २८ बीबी ३२२७) मंदिराजवळ आला होता. सामान भरून गेटच्या बाहेर जात असताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट केसरबाई यांच्यावरून जाऊन भिंतीला धडकला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या केसरबाई जोगदंड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने टेम्पो तिथेच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. सध्या पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. अपघाताने हळहळ व्यक्त या दुर्घटनेमुळे योगेश्वरी मंदिर परिसरात शोककळा पसरली असून उपस्थितांनी दुःख व्यक्त केले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. योगेश्वरी देवल कमिटीने महिला मंदिरात बसणाऱ्या आराधी बाहेर काढल्याने महिलेचा अपघात झाला वर्षानुवर्षे योगेश्वरी मंदिरात सर्व आराधी महिला बसत असताना, नविन आलेल्या कमिटीने या महिलांना आत बसण्यास मनाई केली. त्यामुळे सदरील आराधी महिला मंदिराच्या गेटच्या बाहेर बसू लागल्या. जर योगेश्वरी मंदिर कमिटीने महिलांना मंदिरातून उठून जाण्यास भाग पाडले नसते, तर हा दुर्दैवी अपघात घडला नसता. या चुकीच्या निर्णयामुळे आराधी महिलांना बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे हा अपघात घडला. या घटनेमुळे सर्व आराधी महिला व पुरुष कमिटीवर नाराजी व्यक्त करत आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!