आपला जिल्हामहाराष्ट्र

कागदी कपांवर बंदीची मागणी – पत्रकार आरिफ सिद्दिकींचे निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) कागदी कपांच्या वापरावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी पत्रकार आरिफ अहमद सिद्दिकी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सिद्दिकी यांनी म्हटले आहे की, चहा व अन्य गरम द्रव्यांसाठी वापरले जाणारे कागदी कप आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. या कपांमध्ये विविध प्रकारची रसायने मिसळलेली असतात. गरम द्रव्य ओतल्यास ही रसायने चहा किंवा इतर द्रव्यात मिसळून शरीरात जातात. त्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. सद्यपरिस्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी कागदी कपांच्या उत्पादन व वापरावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या निवेदनावर पत्रकार आरिफ अहमद सिद्दिकी यांची स्वाक्षरी असून त्यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!