आपला जिल्हामहाराष्ट्र

जरांगे पाटील समर्थक पत्रकार रोहन गलांडे यांना संरक्षण द्यावे ! जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करा !

केज/प्रतिनिधी केजचे पत्रकार रोहन गलांडे यांना नंदकिशोर मुंदडा यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार रोहन गलांडे यांना जिवे मारण्यांची धमकी दील्यामुळे अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन,पत्रकार रोहन गलांडे यांना संरक्षण द्यावे व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करावी असे निवेदन मदनलाल परदेशी , ॲड घनशाम घोबाळे इच्छुक उमेदवार, गणेश गगने , गणेश औताडे,बीबीशन निकम , दिपक कांबळे रिपाइं व प्रमोद सर रिपाइं यांच्या वतीने देण्यात आले आहे.या विषय सविस्तर वृत्त असे की दैनिक पुण्यभुमी चे पत्रकार श्री. रोहन गलांडे यांना लोकशाहीच्या भारत देशात हुकुमशाही प्रमाणे धमक्या देणाऱ्या लोकांना जेरबंद करण्यात यावे, हल्लीच्या काळात प्रखर व रोकठोक सत्यता जनतेसमोर मांडणारे पत्रकाराला अशी धमकी देत असेल तर भारत देश पारतंत्र्यात आहे का असे वाटते. पुर्वी पारतंत्र्यात भारतीयांचे बाजु मांडणारे दैनिक केसरीचे थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र लढ्याचा प्रवक्ता व वाणी म्हणून केसरी वर्तमानपत्र पुणे येथे सुरु केले होते, मराठी भाषेतील दर्पण हे वर्तमानपत्र थोर समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर पत्रकार होते. थोर समाज सुधारक गोपाळ गणेश अगरकर, थोर समाजसुधारक प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे, हे मराठी पत्रकार होते. पारतंत्र्यात यांना असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जायचे यांची प्रेरणा व आदर्श घेवून रोहन गलांडे रोकठोक बातम्या देतो. पुण्यामुमी या वर्तमानपत्रातुन पत्रकारीतेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून अख्खा भारत देश पाहतो पण केज मतदार संघातील सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते गलांडे यांची मुसकटदाबी, गळचेपी करुन जिवे मारण्याच्या धमकी देत असतील लोकशाही गणराज्यामध्ये सर्वसमान्य नागरीकांनी जगायचे कसे? अशा गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते यांच्यावर कायदेशिर देशाच्या संविधानाप्रमाणे कार्यवाही करावी व रोहन गलांडे यांना संरक्षण देण्यात आमच्या वाचकाची समर्थकांची मागणी आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!