आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
कृतज्ञ आम्ही….कृतार्थ आम्ही ब्राह्मण ऐक्याने घडविला इतिहास
परळी ( प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित व जिव्हाळ्याचा विषय अखेर मार्गी लागला.महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. त्यासाठी सकल ब्राह्मण समाज कृतज्ञ आहे. त्याचबरोबर ब्राह्मण समाजासाठी अमृत संस्थेचे सर्व लाभही संरक्षीत करण्यात आले आहेत.ब्राह्मण ऐक्याची वज्रमूठ, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,अजितदादा पवार साहेब यांनी अतिशय आत्मियतेने व ब्राह्मण समाजाचा सन्मान राखत हा निर्णय करण्यासाठी वेळोवेळीच सकारात्मक भूमिका घेतली. यामध्ये आमचे नेते खा.सुनीलजी तटकरे साहेब व ना.धनंजय मुंडे साहेब,माजी मंत्री आ.पंकजाताई मुंडे यांनी ब्राह्मण समाज व सरकार या दोहोतील दुवा म्हणून काम केले.यासाठी ब्राह्मण समाजातील विविध संघटना,सर्व स्तरातून अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यथाशक्ती, यथामती प्रयत्न केले. एकंदरीतच परिपाक म्हणजे अमृत संस्थेचे सर्व लाभ संरक्षीत करत स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले.हा एक इतिहास बनला असुन ही बाब कृतज्ञा व कृतार्थ करणारी अशीच आहे.
