आपला जिल्हामहाराष्ट्र

अंबाजोगाई शहरात ईद ए मिलादुन्नबी हर्ष उल्हासात साजरी ईद निमित्त रोटरी क्लब अंबाजोगाई तर्फे अल्पहाराचे वाटप

अंबाजोगाई प्रतिनिधी:- सय्यद नईम आज दि 22/09/2024 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथे मिलादुन्नबी च्या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात आला यावेळी हिंदू मुस्लिम बांधवां चे ऐक्याचे दर्शन धडले. ठीक ठिकाणी जुलूस मधील युवा ,वयोवृद्ध व बालकाना पिण्यासाठी जूस ,पाणी शरबत ची वितरण करण्यात आले हे सर्व मुस्लिम युवा मित्र मंडळांनी स्वखर्चाने केला होता. मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षीही गणपती विसर्जन एक दिवस आगोदर ईद आल्याने पोलीस प्रशासनाने मुस्लिम कमिटीच्या समोर ही विनंती केली हे दोन्ही सण एक दिवसाआड आल्याने प्रशासनावर समाजिक दडपण आल्याने कोर कमेटी समोर ठेवताच सर्व मुस्लिम बांधवांनी अगोदर गणपती विसर्जन होऊ द्या आम्ही बावीस सप्टेंबर ईद साजरी करू यातच मुस्लिम ऐक्याचे दर्शन धडले ईद ए मिलादुन्नबी म्हनेजच ईद मिलाद हा सण मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस. हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्म व धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी जग पिंजून काढले. इस्लाम धर्माची शिकवण देतांना मोहम्मद पैगंबर यांनी तमाम इस्लाम बांधवाना आपल्या धर्माचा सन्मान करा व ते करताना इतर धर्मियांचा देखील आदर राखण्यासाठीची शिकवण दिली. आज याच शिकवणीवर देशातील मुस्लिम बांधव चालतांना दिसून येते हा जुलूस नुरानी मज्जिद, पासून सुरुवात होऊन सदर बाजार चौक,गवळीपुरा, जुमेरात बाजार ,मंडी बाजार पाटील चौक ,मंगळवारपेठ,बस स्टॅन्ड,शिवाजी चौक, व जिल्हा परिषद ग्राउंड येथे अनेक मान्यवर मौलानानी युवकांना (नबी मोहंमद रसूल सलेल्लाव सल्लम) चे विचार आचरनात आणावेत त्यांनी सांगितलेल्या शांततेतेचा मार्गानी चालावे आपल्या बयानतुन् आसा सन्देश् युवकांना दिला आहे.नंतर उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी प्रसादाचा लाभ घेतला मरकजी मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट इस्माईल गवळी, उपाध्यक्ष हुसेन शहा, एडवोकेट माझेदअली उस्मानी एडवोकेट फरकूनअली,खालेद चाऊस, रोफ बिल्डर, अकबर पठाण, जुबेर पठाण, फिफाजत मिर खा, यया चाऊस,सरफराज भाई, मौलाना रहीम साब कोर कमेटीच्या सर्व सदस्य यांनी पोलीस प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार मानले

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!