दुधनी व मैंदर्गी शिवारातील बोरी नदि पात्रातील वाळू चोरी थांबवावी -सैदप्पा झळकी यांची मागणी….!

अक्कलकोट:- अक्कलकोट तालुक्यातील दुधनी व मेंदर्गी या परिसरातील बोरी नदी पात्रातील वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे.ते तात्काळ थांबवावे अन्यथा रिपाइं(आठवले गट)कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी आणी मेंदर्गी शिवारातील बबलाद,चिंचोळी(मैं),आंदेवाडी(ज),रुद्देवाडी,संगोगी(ब),बिंजगेर व सातनदुधनी येथील बोरी नदीतून मध्यरात्री भरमसाठ वाळू उपसा करुन अवैध्यरित्य विक्री केली जात आहे.या भागातील गोर गरीब व शासनाकडून विविध योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम महागड्या वाळू घेवून करणे मुस्कील झाले आहे.येथील वाळू दर एकब्रासला सहा हजार तर भीमा नदीतील वाळू पाच ब्रासला छप्पन हजार प्रमाणे विकली जात आहे.या भागातील पोलिस,पोलिस पाटील, पोलिसमित्र आणी सरपंच यांच्या संगनमताने हे वाळू उपसा करुन विकली जात आहे. अशा महागड्या वाळूमुळे अल्पअनुदान मिळणारे घरकुलधारक व गोर गरीब महाग असलेल्या वाळू ऐवजी डस्ट ने बांधकाम करणे पसंद करु लागले आहे. त्या मुळे संबंधित अधिकार्यांने जातीने लक्ष घालून हे सर्व वाळू दोरीने विकण्याचे प्रकार बंद करण्याचे मागणी श्री सैदप्पा झळकी यांनी केली आहे.



