आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेच्या सोलापूर विभागातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करा – सोलापूर विकास मंचची मागणी

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सोलापूर विकास मंचने मांडलेल्या प्रवाश्यांच्या मागण्या_

Spread the love

सोलापूर:- सोलापूर विकास मंच तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सोलापूर विभागातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीत प्रवाश्यांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली तसेच अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने तथा उत्कृष्ट सुरू असुन सोलापूर रेल्वे स्थानक तथा विभाग भारतात मानाचे स्थान निर्माण केल्या बद्दल मंचच्या सदस्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि डि.आर.एम. यांचे कौतुक केले.

सोलापूर रेल्वे स्थानका बाहेरील परिसर अनाधिकृत बेकायदेशीर हॉकर्स तथा इतर अतिक्रमणे मुक्त करुन विकसित करणे, हुतात्मा एक्सप्रेससाठी सामान्य तिकीट सेवा पुन्हा सुरू करणे, सोलापूर-नागपूर गाडी सेवा सुरू करणे, हुबळी-हैदराबाद एक्सप्रेसला सोलापूरमार्गे वळविणे, वंदे भारत एक्सप्रेसवरील तिकीट दर कमी करणे आणि कोविड-१९ साथीच्या काळात बंद केलेल्या प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करणे यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी या समस्यां आणि मागण्यांचे गांभीर्याने विचार करून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

प्लॅटफॉर्म प्रवेशाच्या समस्यांवरही चर्चा झाली. सोलापूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र.१ वर बहुतेक गाड्या थांबत नसल्यामुळे महिला, मुले आणि वृद्ध प्रवाशांना पादचारी पुलाचा वापर करावा लागतो, ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येचे निराकरण म्हणून सोलापूर थांब्याच्या सर्व महत्त्वपूर्ण गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्र.१ वर थांबे सुनिश्चित करण्याची विनंती ह्यावेळी करण्यात आली आहे. यावेळी सोलापूर विकास मंचचे केतन शहा, योगिन गुर्जर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, आनंद पाटील, राजु बिराजदार, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. सोलापूरच्या रेल्वे सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी या विकास मंचाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. प्रवाश्यांच्या सोयीसाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण पावलांनी सोलापूर विभागातील रेल्वे सेवांचा दर्जा उंचावेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!