संस्कृत सरल परीक्षा ह. दे. प्रशालेचा 100 % निकाल…..!

सोलापूर:- (रत्नाकर लोंढे याजकडून)संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्त आयोजित संस्कृत सरल परीक्षा 2023-2024 अंतर्गत सरला, सुगमा, सरसा व सुखदा या परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आल्या. या परीक्षेला 84 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 27 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. 67 विद्यार्थ्यांनी विशिष्ट श्रेणी प्राप्त केली. तसेच 16 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी या परीक्षेला बसतात. 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशाला मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, पर्यवेक्षिका दीपा फाटक, पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, पर्यवेक्षक लक्कणा कमळे व दयानंद डीएड् महाविद्यालयाच्या प्रमुख डॉ लता बामणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन कौतुक करण्यात आले. विद्यार्थी यादी वाचन संस्कृत विभाग प्रमुख निखिल बडवे सर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना राघवेंद्र पिल्ले सर, अंजली ढगे मॅडम व निखिल बडवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.




