आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) जिल्हा शाखा नांदेड तर्फे कर्मचारी संवाद कार्यक्रम अंतर्गत तालुका कार्यकारिणीचे गठन

Spread the love

नांदेड-(सखाराम कुलकर्णी)महाराष्ट्र राज्य जि. प. कर्मचारी युनियन (ओंकार) जिल्हा शाखा नांदेड तर्फे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कर्मचारी बांधवांशी विविध अडी-अडचणी विषयक चर्चा करून यांना उद्भवणाऱ्या अडचणी विषयी संबंधित विभाग प्रमुख व सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधण्यासाठी *कर्मचारी संवाद दौरा* सुरू करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पंचायत समिती स्तरावर भेटी देऊन तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 19 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती . यामध्ये एकूण १६ तालुक्यातील कर्मचारी बांधवांशी संवाद साधून तालुका स्तरीय कार्यकारिणीचे गठन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक तालुक्यातील कर्मचारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदरील दौरा कार्यक्रम कर्मचारी युनियनचे नेते तथा प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या नेतृत्वात आणि राज्य सहसचिव देवेंद्र देशपांडे, जिल्हाध्यक्ष धनंजय गुम्मलवार, सचिव राघवेंद्र मदनूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कर्मचारी युनियनचे मार्गदर्शक माधवसिंह चव्हाण, शिवाजीराव मुपडे, व इतर पदाधिकारी सर्वश्री मुकेश पाटील, सचिन चौदंते,संतोष मठपती, पवन तलवारे, शेख मुकरम,अविनाश मेडपलवार, खाजा मोहियोदीन, नागेश सिंदगीकर, सतीश चोरमले, जितेंद्र तोटलवाड, नितीन पाम्पटवार, शेख रब्बानी, उमाकांत हाळे, संतोष राऊत, राजकुमार पांगरीकर, निरंजन जाधव, गणेश मुगवे, संजय नरमिटवार, दिलीप चौंडे, ऋषिकेश उदगीरकर, वैभव सुरोशे, संतोष कुलकर्णी , माधव पांडे, विजय टोकलवाड, संतोष राऊत, विक्रम रेनगुंटवार, बद्रीनाथ मुदलियार, धुलबा हूरदुके,शेख जाफर, श्रीमती एल. एस. भावे, श्रीमती बास्टेवाड, सौ.एम. के. सिंगनवाड, श्रीमती आय. एम. वाघमारे यांनी तालुका दौऱ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

पुढीलप्रमाणे तालुका निहाय कर्मचारी युनियनची कार्यकारणी निवडण्यात आली आहे.
*नायगाव अध्यक्ष* – शेख नवाज, सचिव – किशोर दाभडकर
*देगलूर अध्यक्ष* – बी. जे. नीलमवार, सचिव – एस.बी. कुटे
*मुखेड अध्यक्ष* – मनोज राठोड, सचिव – रवी बोडके. *बिलोली अध्यक्ष*- जुगनू दीक्षित, सचिव- रमेश पांचाळ *धर्माबाद अध्यक्ष*- संजय वाघमारे, सचिव- उदय देशपांडे *उमरी अध्यक्ष*- राम विलास तेलंग,सचिव- ज्ञानेश्वर खूपसे, *हदगाव अध्यक्ष*- एस.एम. मेने, सचिव- सदाशिव इटेवाड *हिमायतनगर अध्यक्ष*- रवी देवसरकर, सचिव – व्यंकटेश
दमकोंडवार, *भोकर अध्यक्ष*- श्री ओमप्रकाश हिंगमिरे,सचिव- आय. आर. लोखंडे. *कंधार अध्यक्ष*- कुमार कांबळे, सचिव डी.व्ही. गडपल्लेवार, *लोहा अध्यक्ष*- संतोष गायकवाड, सचिव – पी. एच. इज्जपवार *मुदखेड अध्यक्ष*- व्ही. के. सोनूणे, सचिव- आर.आर. अंबुलगेकर *नांदेड अध्यक्ष*- शंकर वरखिंडे, सचिव – ए. बी. उगवे *किनवट अध्यक्ष*- सुनील नेमानीवार, सचिव – अंकुश राठोड *माहूर अध्यक्ष*- जयराम केंद्रे, सचिव – मोहन सोनवणे *अर्धापूर अध्यक्ष* संतोष बारडकर, सचिव- उमाकांत पिंगळे
तसेच आगामी काळात सतत तालुकास्तरावर संपर्क व समन्वय ठेवणार असल्याबाबत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष धनंजय गुम्मलवार,सचिव राघवेंद्र मदनुरकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!