*दुधनी जि प मराठी केंद्र शाळा प्रवेश दिनाच्या मेळावा संपन्न*

अक्कलकोट दि.४-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शाळा प्रवेश दिनानिमित्त मेळावा संपन्न मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गोरखनाथ धोडमनी हे होते.प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन उपाध्यक्ष हणमंत कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आली.मेळाव्याचे शुभारंभ शाळा व्यवस्थापन समितिचे सदस्य महेदिमिंया जिडगे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मराठी शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्री गोरखनाथ धोडमनी, उपाध्यक्ष हणमंत कलशेट्टी, शिक्षण तज्ञ श्री सैदप्पा झळकी,सदस्य श्री महेदीमिंया जिडगे,मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्रीसैल मलगाण सर उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन स्वागत करुन मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,सदस्य महेंदिमिंया जिडगे,श्री.रविकुमार कोरसगावकर श्री.बेण्णेसूर सर सह शिक्षिका महानंदा जाधव,ज्ञानेश्वरी कारेकर व धनश्री गीण्णी महानंदा जाधव तसेच सर्व विध्यार्थी आणी पालक मोठे संख्यात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रविकुमार कोरचगांवकर तर आभारप्रदर्शन श्री संजीवकुमार बेण्णेसूर यांनी केली आहे.



