आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*मंठा हद्दीच्या डेपोतून हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करून अवैध साठा करून रेती पुण्याच्या वाटेला*

Spread the love

मंठा (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील मंठा तहसील अंतर्गत असलेल्या रेती डेपोतून हजारो ब्रास रेतीचे उत्खनन होत आहे .व हि रेती आसपास साठवून पुण्याला जात आहे. अशा हजारो ब्रास उत्खननामुळे मंठा तालुक्याचे नागरिकांना पुढील पाच वर्षात रेतीचा कणही दिसणार नाही अशी परिस्थिती मंठा तहसील अंतर्गत रेती उत्खननातून होत आहे.व गौनखनिज संपत्ती पूर्णपणे संपत असल्यामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे . मंठा तहसील अंतर्गत ऊस्वद, देवठाणा, तळणी या परिसरातील दुधना नदीतून रेती उपसा होत असतो .रेतीची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे व जनतेला रेती मिळत नसल्याच्या तक्रारीमुळे शासनाने 600 रुपये ब्रास दराने रेती जनतेसाठी देण्याचा निर्णय दिला. पण रेती उत्खनन ची निविदा काढल्या जातात. व 600 रुपये ब्रास दाराने रेती मिळत नाही.रेती घ्यायची असेल तर ऑनलाईन नोंदणी करावी लागते .पण ती ऑनलाईन नोंदणी होतच नाही. म्हणून जनतेला रेती तस्कराकडेच जावे लागते. मंठा तहसील अंतर्गत डेपोचे रेतीचे टेंडर पुणे रहिवासी तांबे यांना मिळाले. त्यांना किती ब्रास रेती उत्खननाची परवानगी मिळावी हे गुलदस्त्यात असल्यामुळे त्यांनी हजारो ब्रास रेती उत्खनन केले व त्याचा साठा मंठ्याच्या आसपास सासखेडयाच्या आसपास करून ठेवला.

सध्या मंठयातील नागरीकांना घरबांधणीसाठी इतर कामासाठी रेती पाहीजे असेल तर रेतीमाफिया कडून पाच ते सहा हजार रुपये ब्रास या भावाने रेती विकत घ्यावी लागते. तहसीलदार सह महसूल चे कर्मचारी 15 ते 20 दिवसाला विनापरवाना रेती वाहतूक करणारे एखादे टिप्पर पकडून कारवाई करतात .मात्र ठेकेदाराने साठवून ठेवलेली रेती कडे दुर्लक्ष करतात. ही. हजारो बरास साठवून ठेवलेली रेती पुण्याकडे जाणार असे नागरिकात बोलल्या जाते. रेती मिळत नसल्यामुळे जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी

*रेती द्या हो रेती* विहीर बांधकामास फक्त सहा-ब्रास रेती द्या.असी मागणी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी जालना, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर व तहसीलदार मंठा यांचे कडे पत्र देऊन केली. पण महसूल विभागाला अद्याप जागा आली नाही. किंवा खरा काय प्रकार आहे याची चौकशी पण केली नाही. सर 2021 -22 मध्ये ही तत्कालीन तहसीलदार सुनीता मोरे यांच्या काळातही रेती तस्करी फार मोठा प्रमाणावर झाली होती. त्याची चौकशी चालूच आहे. अशा मोठया प्रमाणात रेती उत्खनन मूळे रेती दिसणार पण नाही. असे नागरिकांना वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!