आपला जिल्हाताज्या घडामोडी

जय भारत प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव 2024 कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न.

Spread the love

सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेत पहिला दिवस प्रवेशोत्सव 2024-2025 हा कार्यक्रम नवागताचे स्वागत औक्षण करून व फुलांचा वर्षाव करून करण्यात आला. सर्व बालवाडी व पहिली नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुती माळगे  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सिद्राम फुले गुरुजी – चेअरमन, श्री. दीपक फुले – सचिव,श्री.सूर्यवंशी सर – मुख्याध्यापक, पालक वर्ग शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, विद्यार्थ्याने अभ्यास करून खूप मोठे व्हावे, असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी कविता लेंगरे मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन किरण घाटे सरांनी केले, तर आभार कुमारी रेश्मा म्हेत्रे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!