आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

*नांदेड विधानपरिषद सदस्य आ.राम पाटील रातोळीकरांचा कार्यकाळ कार्याविना संपत आहे*

Spread the love

नांदेड-( सखाराम कुलकर्णी) विधान परिषदेवर निवड झालेले नांदेडचे राम पाटील रातोळीकर यांनी पक्षासाठी व जनतेसाठी ठळक काम केले नसल्यामुळे कार्याविना 27 जुलैला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. आता पुढे कोणाचा नंबर लागतो की पुन्हा एकदा यांनाच संधी दिली जाते याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. काही काळ सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आता नेते झालेत. मिशी फुटली की तो कार्यकर्ता दादा, भाऊ, भैया अशा पदव्या लाऊन मिरवायला सुरुवात करतो. त्यातूनच आमदार होण्याची ओढ प्रत्येक कार्यकर्त्यात निर्माण झाली. जनतेचे सेवक या सदराखाली 33 वर्ष नोकरी न करता पाच वर्षात आयुष्यभर पेन्शनचे वेतन सुरू करून घेणे. आमदारकी मिळाली की आयुष्याची कमाई झाली. अस या आमदार होण्यास मतदाराकडून निवडून यावे लागते किंवा पक्षाकडून डायरेक्ट जाता येते. ज्या कार्यकर्त्यास मतदाराकडून म्हणजे विधानसभा निवडणुकीतून आमदार होण्याचा भरोसा नसेल ते कार्यकर्ते डायरेक्ट विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होतात व यांचा कार्यकारी एक वर्षाने जास्त असतो हा फायदा पण आहे. पुढील महिन्यात विधान परिषदेच्या बऱ्याच जागा रिकाम्या होत आहेत. त्यात नांदेडचे राम पाटील रातोळीकर यांचाही नंबर आहे. रातोळीकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2024 ला संपत आहे यांनी आमदारकीच्या माध्यमातून भाजपा पक्ष वाढीसाठी कोणतेही कार्य केले नाही असे भाजपा कार्यकर्त्यात बोलले जाते.त्यामुळे यांच्या कार्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांतून नाराजीचा सूर निघतो. खासदार- आमदार एकमेकांच्या हेव्या देव्यात व गटा तटात नांदेडचा भाजप पक्ष वाढला नाही. भाजपचे संघटन झाले नाही. की सहा वर्षात आमदार रातोळीकर यांनी एखाद्या अधिवेशनात एखादा चांगला प्रश्न लावून धरला नाही. नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या अडी -अडचणी अधिवेशनात कधी मांडल्या नाहीत. तर यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे पुढील नंबर आपला लागावा म्हणून बरेच नेते बाशिंग बांधून आहेत. तसेच आमदार रातोळीकर पण वन्स मोअर साठीच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!