आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*सोलापूरकरांचे सर्व प्रलंबित प्रश्न केंद्रातुन विकास मंचच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी कटिबद्ध – खा.प्रणितीताई शिंदे*

_सोलापूर विकास मंचच्या वतीने बुके ऐवजी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्याबद्दल केले कौतुक_

Spread the love

सोलापूर:- सोलापूर विकास मंचच्या वतीने प्रस्तुत अतिशय अभ्यासपूर्णपणे सोलापूरच्या केंद्र शासनाच्या निगडीत सर्व प्रलंबित विषयांची यादी मी वाचली असुन, केंद्रातील विविध मंत्रालय आणि खात्यांच्या अधिकार्‍यां समवेत वेळोवेळी पाठपुरावा करून ते मी सोडविण्यासाठी तुमच्या सर्वांच्या हक्काची खासदार म्हणून कटिबद्ध असल्याची ग्वाही सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिली.

सोलापूर विकास मंचच्या वतीने बुके ऐवजी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्याबद्दल कौतुक केले. सोलापूर विकास मंच नेहमीच समाजाने आदर्श घ्यावा असेच कार्य करत आहे. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, प्रशांत भोसले, रमेश माळवे, गणेश शिलेदार, सारंग तारे, भारत पाटील, रियाज शेख आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!