राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती स्वाभिमानी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.!!

सोलापूर := भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थकारणाचे जागतिक महामेरु, सुप्रशासनाचे जनक, भारत भाग्यविधाता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज दि.14 एप्रिल 2024 रोजीच्या भीम ” जन्मोत्सवाच्या ” 133 व्या जयंती दिनानिमित्त राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती स्वाभिमानी संघटना शाखा, शहर जिल्हा सोलापूर यांच्यावतीने आज सकाळी 11-30 वाजता राज्य कामगार विमा रुग्णालय सोलापूर जिल्ह्याचे सर्वोसर्वा ज्येष्ठ नेते आणि रासकम.स्वाभिमानी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांचे हस्ते तसेच मुंबई (वरळी) येथील वरिष्ठ वैज्ञानिक लेखाधिकारी, मुंबई.यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी रासकम.स्वाभिमानी संघटनेचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्यासह, जिल्हा कार्याध्यक्ष सी.एस.स्वामी, निमंत्रक बाळकृष्ण पुतळे , कार्यालयीन सचिव शशिकांत भालेराव, सहसचिव संतोष भंडारे, संघटक आर.जे.शिंदे , उपाध्यक्ष भीमराव लोखंडे, उपाध्यक्ष सटवाजी होटकर, उपाध्यक्ष प्रभाकर माने, उपाध्यक्ष एम.वाय.पटेल,उपाध्यक्ष ए.आर. रंगरेज, उपाध्यक्ष सुनील बोलाबत्तीन, उपाध्यक्ष प्रविण वाघमारे यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती स्वाभिमानी संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह इतर रासक मध्यवर्ती स्वाभिमानी संघटनेशी संलग्नित असलेल्या अनेक खातेनिहाय कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सभासद व कार्यकर्ते बहुसंख्येने सदर अभिवादन कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते.!



