*ह.दे .प्रशालेत महामानव, ज्ञानसूर्य, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.*

सोलापूर:-( रत्नाकर लोंढे याजकडून) ह.दे .प्रशालेत महामानव, ज्ञानसूर्य, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.करण्यात आले शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन सर ,ह .दे. प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य . श्री. प्रकाश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कलानिकेतन मध्ये महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविकामध्ये श्रीमती हरहरे मॅडम यांनी महामानवाचे कार्य व संविधान यांची माहिती देऊन त्यांचे विचार आचरणात आणून जनमानसात रुजवले पाहिजेत असे सांगितले .प्रमुख अतिथी स्वाती लोंढे मॅडम व मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले ,त्याप्रसंगी धम्मवंदना श्री. सर्वगोड सर ,श्री .लोंढे सर ,श्री. गाडे सर ,श्री .कांबळे सर, श्रीमती सावंत मॅडम यांनी सादर केली.प्रमुख अतिथी श्रीमती स्वाती लोंढे मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार मा. मुख्याध्यापक उपमुख्याध्यापकांनी केला.प्रमुख अतिथी श्रीमती स्वाती लोंढे मॅडम यांचा परिचय प्रशालेचे जेष्ठ पर्यवेक्षक श्री. मोतीबने सर यांनी करून दिला व त्यांचे शाळेचे असणारे ऋणानुबंध अधोरेखित केले.श्रीमती स्वाती लोंढे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे ब्रीदवाक्य हा संस्कार आहे असे सांगून प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बाप हा मानाचे स्थान मिळवून देणारा असतो आणि हा बापमाणूस हा बाबासाहेब आहे असे सांगून त्यांचे विचार, संविधान यांची माहिती दिली व संविधानाचा जागर व्हावा असे सांगून सावित्रीबाई यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित स्वरचित कविता सादर केली.
मुख्याध्यापक श्री प्रकाश कांबळे सर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे हा विचार बाबासाहेबांनी अंगीकारला होता हे सांगून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगून बाबासाहेबांचे विचार आपण कृतीत आणावे असे सांगितले.कार्यक्रम प्रसंगी उपमुख्याध्यापक श्रीमती स्मिता क्षीरसागर मॅडम, प्रशालेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व पर्यवेक्षक ,सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजिरी हरहरे मॅडम यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती दीपा फाटक मॅडम यांनी केले.अल्पोपहार व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.




