आपला जिल्हाताज्या घडामोडी

जय भारत प्राथमिक शाळेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी ……!

Spread the love

सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेमध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे हितचिंतक श्री चंद्रकांत साबळे गुरुजी तर प्रमुख उपस्थित. चेअरमन  श्री सिद्राम  फुले गुरुजी  प्रमुख अतिथी दीपक फुले, शाळेचे मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी सर सर्व शिक्षक वृंद व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत आहे आणि भीम गीत सादर करण्यात आले त्यामध्ये सर्वप्रथम पूजा आर्गोळू प्रतीक्षा म्हेत्रे,संकेत गायकवाड,संदेश गवळी,अमित कांबळे,नागमणी भंडारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेशभूषामध्ये आलेला इयत्ता 4थी मनोज अंबादास भंडारे यांनी,” मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतो” यावर उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना रोज वाचायला सांगितल ,”वाचाल तर वाचाल” असे मंत्र दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रेशमा म्हेत्रे यांनी केले तर आभार कविता लेंगरे मॅडमने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!