*भाजपात प्रवेश केल्याचा नांदेडकरांना आनंद झाल्याचे अशोकरावांच्या जल्लोषात झालेल्या स्वागता वरुन दिसले*

नांदेड -( राजकीय विश्लेषण-सखाराम कुलकर्णी ) भाजपाचे चांगले दिवस असल्यामुळे अशोकराव भाजपमध्ये गेल्याचा आनंद त्यांच्या कार्यकर्त्यांना झाल्याने अशोकराव यांचे जंगी स्वागत झाले असे दिसते. अशोकराव चव्हाण यांची नांदेड सह मराठवाड्यात लोकप्रियता आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांची सध्याची राजकीय स्थिती व काँग्रेस पक्षाची होत चाललेली वाताहात जनतेला व राजकीय क्षेत्रात दिसत आहे. व भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य वाढत चालले हे दिसतआहे. अशोकरावांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतला तो राजकीय वातावरणावरून हा निर्णय त्यांचे साठी योग्य असू शकतो. जरी ईडीच्या धाकामुळे भाजपात प्रवेश केला अशी चर्चा असली तरी, हे सत्य ही असेल, तर आपल्या बचावासाठी भाजपमध्ये प्रवेश केला हेही योग्यच आहे. शेवटी माणूस आपल्या बचावासाठीच वेगवेगळे प्रयत्न करत असतो.

तसेच त्यांच्या घराण्यात पुढेही राजयोग असावा व राजकीय नेता असावा असही अशोकरावांना वाटले असेल. तर त्यासाठी सध्याच्या परिस्थितीत कन्येला पुढे आणायचे, राजकारणात सक्रिय करायचे असेल तर भाजप सारखा दुसरा पक्ष नाही हे अशोकरावांनी ओळखले असावे. भाजपाला नांदेड जिल्ह्यात परिपक्व नेता नव्हता. खा. प्रतापरावांचे वर्चस्व व लोकप्रियता फक्त लोहा, कंधार मध्येच आहे. हेही भाजपाने ओळखले असावे. व त्यामुळे नांदेड जिल्ह्य़ात भाजपामय करण्यास अशोकराव सारखा लोकप्रिय नेत्याची गरज भाजपालाही होती. खा. प्रतापरावांनी निष्ठावंत जूने कार्यकर्ते बाजूला फेकले होते याची खंत व नाराजी निष्ठावंत कार्यकर्त्यात होतीच .प्रतापरावांनी फक्त विशिष्ट मोजकेच कार्यकर्ते व स्वतःचा मुलगा- मुलगी एवढेच भाजपाचे अस्तित्व निर्माण केले होते. हेही जनतेला व भाजपातील वरिष्ठ नेत्यांना दिसून आले असेल. याचा सर्व विचार करून, परिस्थितीचा विचार करून अशोकराव चव्हाण यांना भाजपची गरज भासली व भाजपाला अशोक रावांची गरज भासली. त्यामुळेच अशोक रावांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असेल व भाजपाने त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असेल नाकारता येत नाही. अशोकरांच्या भाजपा प्रवेशामुळे नांदेड जिल्हा भाजपामय होऊन नांदेड ची महापालिका, जिल्हा परिषद ,तालुक्याच्या नगरपरिषदा, पंचायत समिती सर्व भाजपाच्या हातात येऊन भाजपचे वर्चस्व वाढेल हे नक्कीच. हे मात्र खा. प्रतापराव चिखलीकरांना एकदाही जमले नसते . भाजपाचे खासदार झाल्यावर अशोकराव चव्हाण यांचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत झाले. या वरून हे दिसते की अशोकराव भाजपात आल्याचा सर्व जनतेला त्यांच्या कार्यकर्त्यांना पण आनंद झाला. आता भाजपाच एकमेव पक्ष आहे हे जनता ओळखून आहे.हे वास्तव आहे



