आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*टायरचे कोटेशन घेऊन 22 हजार खर्चाची नोंद. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांचा अजब कारभार*

Spread the love

नांदेड-( सखाराम कुलकर्णी) जिल्हा परिषद नांदेडच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी अकस्मित खर्च करताना शासनाच्या तिजोरीतून वारे माप खर्च केलाच पण टायरचे फक्त कोटेशन घेऊन कालानी टायर्स नांदेड या दुकानदारास सहकार्य करून 22 हजार रुपये अदा केल्याचे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत घेतलेल्या माहितीवरून दिसत आहे.

जिल्हा परिषद नांदेड चा पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभाग बऱ्याच गैर कामामुळे चव्हाट्यावर येतच आहे. जिल्हा परिषद च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांचे विश्वासू अधिकारी असलेले तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांचा गैर कारभार विशेष करून चव्हाट्यावर येत आहे. जिल्हा परिषद लाअकस्मिक खर्चासाठी शासनाने भरमसाठ निधी देऊन त्या तिजोरीची चावी तत्कालीन मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या हातात दिली. त्यांनी त्या चावीने जिल्हा परिषद ची तिजोरी केव्हाही किती वेळाही उघडून मनमानी असा आकस्मिक खर्च सुरू केला. पण त्या खर्चाची बिल पाहता व किंमत पाहता खर्च केला नसून खर्च झाल्याचे दाखवले असे दिसून येते.

डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दि.१७-०३-२०२२ ला एम एच २६ बिसी ६७८८ या वाहनासाठी तीन टायर घेतल्याचे दाखवले त्याचे कोटेशन कालानी टायर्स नांदेड यांचेकडून घेतल्याचे दिसून येते व या कोटेशन वरच ठोंबरे यांनी 22 हजार रुपये सदरील कालानी टायर्सला अदा केले. टायर घेतले असते तर बिल आले असते. जर हेच बिल असेल तर त्या फार्म कडून बिल न घेता त्याचा वस्तु व सेवाकर शासनाचा (जीएसटी ) महसूल वाचवण्यास सदरील फर्मला सहकार्य करून २२हजार तिजोरीतून हडप केलेच व २२ हजारावरचा जो जीएसटी वस्तू व सेवा कर शासनाच्या तिजोरीत जातो तो जाऊ दिला नाही

.असा वारेमाप खर्च करताना डॉ. सुधीर ठोंबरे यांनी एकही संधी गमावली नाही . २०२१ च्या माळेगाव यात्रेतील मानकरांना पटका बांधण्यास कासलीवाल लहानकर यांचे दुकानातून ८ पटके घेतले. त्याची किंमत प्रत्येकी ६२०० अशी आहे .आठ पटके खरेदी करून अर्धा लाख पटक्यावरच खर्च केला. तर आठ टावेल प्रत्येकी ४९० रुपयाचे आठ साल प्रत्येकी ४५०रुपये असा एकूण ५८ हजार २००रुपये खर्च झाल्याचे दाखवले .हे त्यांचे बिलही संशयास्पद असे आहे. ते असे की बिलात वस्तूची किंमत लिहून खाली जीएसटी, एसजी एसटी दाखवून एकूण रक्कम असते. तर या बिलात जीएसटी २.५% नोंद केली पण ती रक्कम दुकानदाराने यांचे कडून घेतलीच नाही. पटका शाल आले की हार तुरे येतातच ते ३५००रूपयाचे झालेत .विशेष करून ठोंबरे यांचे हार तोरे साठी दोन दुकानदार स्टेशनरी व इतर साहित्य साठी ठरलेले दोन दुकानदार आहेत. त्यामुळे असा संशय येतो की बिलबुकच जिल्हा परिषद च्या तिजोरीत आहेत की काय?हा हे प्रश्न समोर येतो त्याही फर्म ची नावे लवकरच समोर येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!