आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*पत्रकार सुरक्षा समिती चे नूतन मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब(तात्या)शिंदे यांचा सत्कार*

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती ची धाराशिव येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारख्या गुन्हे दाखल झालेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणे राज्यातील पत्रकार होणारे हल्ली धमकी मारहाण पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणे राज्यातील पत्रकारांच्या वाहनाला टोल मधून सूट देणे या सह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा नूतन अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात ल्या.

*मराठवाडा विभाग मधील पत्रकारांना एकत्र आणणार*
राज्यात पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल व गंभीर होत असून बातमी लावण्या वरून पत्रकारांना मारहाण धमकी व हल्याच्या प्रमाणात वाढ झाली असून महाराष्ट्र राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाही शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात प्रलंबित असून पत्रकार होणारे हल्ले ही पुरोगामी महाराष्ट्र शोभणारी बाब नाही पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मराठवाडा विभाग मधील पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद आयुब शेख नंदकुमार शेटे व अन्य पत्रकार उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!