आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*माघवारीतील तिसरे गोल रिंगण पेनूर येथे भक्तीमय वातावरणात संपन्न*

Spread the love

पेनुर:- माघवारी पालखी सोहळा परंपरेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो.” जाता पंढरीसी सुख वाटे जीवा “या उक्तीप्रमाणे हजारो वारकरी भाविक “ज्ञानोबा तुकाराम “. नामाच्या गजरात उत्साहात चालत जातात. या सोहळ्यातील तिसरे भव्य गोल रिंगण महात्मा गांधी विद्यालय, पेनूर, ता. मोहोळ जि. सोलापूर येथे दि. 18-02-2024 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले . हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतिहासिक परंपरा सुरु झाली आहे .

माघवारी निमित्त मोहोळ मार्गे पंढरपुरला जाणाऱ्या दिंडीचे रिंगण सोहळासाठी एकत्रीकरण करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या पुजनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला . अखिल भाविक वारकरी मंडळ व जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन बापू कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष), ई. यांच्या कडून पेनूर ग्रामस्थांतर्फे सरपंच सुजित अवारे , उप सरपंच सागर चावरे यांचे कडून सन्मान करण्यात आला आहे. तसेच दर्शन ढगे, राकेश अन्नम, पांडुरंग शिंदे, बप्पा कापसे, अच्युत मोफरे, ई. या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात येणार असून सरपंच श्री. सुजित आवारे , ह.भ.प. भागवत चवरे महाराज, ह भ प दयानंद भोसेकर महाराज, सागर चावरे (उप सरपंच) ई. पदाधिकारी यांचे हस्ते रिंगणातील मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले होते. सर्व दिंडी प्रमुख विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरु करण्यात आले. पेनूर पंचक्रोशितील भाविकांच्या उपस्थितीत दि. 18-02-2024 रोजी सकाळी 10.00 वा. हा सोहळा संपन्न झाला. अश्व धावताना सात्विक ऊर्जा दिसत होती. अतिशय आनंदी वातावरण असल्याने विद्यार्थी रिंगण पुर्ण करताना उत्साह खूपच चांगला दिसून आला. या सोहळ्यासाठी बळीराम नाना चवरे , महेश चवरे , निवृत्ती मोरे , सचिन गायकवाड (शहर उपाध्यक्ष), गणेश वारे, ई नी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!