बिग ब्रेकिंग…..! मिनिमम पेन्शन वाढीबाबत दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंतिम प्रस्ताव तयार होणार…. !
दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत आशादायक निर्णय येण्याची शक्यता.... कमांडर अशोक राऊत.....!

भवानीनगर : दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी मथुरेच्या खासदार सौ हेमा मालिनी यांच्या मध्यस्थीने व केंद्रीय श्रम मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशनानुसार श्रम मंत्रालय कर्मचारी भविष्य निधी संघटनचे उच्चस्तरीय अधिकारी व राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रतिनिधी मंडळ यांच्यामध्ये श्रम मंत्रालय नवी दिल्ली येथे बैठकीमध्ये ठरलेनुसार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 व दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दोन दिवसाची सकारात्मक बैठक सफलता पूर्वक संपन्न झाली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऑफिसच्या अधिकाऱ्यांबरोबर दोन दिवस सकारात्मक चर्चा होऊन ईपीएफओ दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम स्वरूपात प्रस्ताव तयार करून यावर दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यंत चांगला आशादायक निर्णय होणे अपेक्षित असल्याचे ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले.

दिनांक 16 फेब्रुवारी 2024 च्या बैठकीमध्ये चर्चा होऊन दोन्ही बाजूच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपापली बाजू मांडली व दोघांचीही म्हणणे ऐकून घेऊन पुढील बैठकीत राष्ट्रीय संघर्ष समितीच्या अधिकाऱ्यांनी पेन्शनवाढी बाबतचे चार प्रस्ताव तयार करून पुन्हा दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजतां चर्चेसाठी बोलवण्यात आले होते. या अनुषंगाने दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऑफिसच्या मॅडम श्रीमती नीलम शमी राव यांचे समवेत ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची मिनिमम पेन्शनवाढी बाबत सफलतापूर्वक चर्चा झाली.
सदरच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय संघर्ष समितीमार्फत मिनिमम पेन्शनवाढी बाबतचे चार प्रस्ताव देण्यात आले. या प्रस्तावाच्या प्रति अर्थसचिव तसेच श्रमसचिव यांना देखील देण्यात आल्या. सदरच्या देण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये किमान पेन्शन रुपये 7500 अधिक महागाई भत्ता मिळावा. दुसरा प्रस्ताव रुपये 7500 व महागाई भत्ता ताबडतोब देणे शक्य नसेल तर अंतरिम वाढ म्हणून सध्याची मिळणारी पेन्शन अधिक रुपये 5000 वाढ देण्यात यावी. तिसरा प्रस्ताव पाच हजार रुपये शक्य नसेल तर सध्याची मिळणारी पेन्शन अधिक रुपये 4000 अंतरिम वाढ देण्यात यावी. मात्र आमची मागणी रुपये साडेसात हजार अधिक महागाई भत्ता वाढ ही कायमचीच असेल. चौथा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने इतर उद्योग धंद्यातील लोकांना जी वृद्धापकाळ पेन्शन योजना राबविली आहे ती वृद्धापकाळ काळ पेन्शन योजना सदरच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुरू करण्यात यावी. यासाठी राज्य शासनावर दबाव आणण्याची मागणी करण्यात आली. वेळप्रसंगी राष्ट्रीय संघर्ष समिती यावर आंदोलन देखील केले जाईल. इत्यादी प्रस्ताव सादर करण्यात आले.
या चर्चेनंतर श्रीमती नीलम शमी राव यांनी सांगितले की आम्ही गेले सहा महिन्यापासून केंद्रीय मजूर मंत्री श्री भूपेंद्र यादव यांचे निदर्शनानुसार राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पेन्शन वाढीच्या संवेदनशील व भावूक विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करीत आहोत. आम्हाला यावर निर्णय घ्यावयाचाच आहे. सेवानिवृत्त पेन्शन धारकांच्या मेडिकल सुविधा या विषयावर अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. मेडिकल सुविधा बाबतचा आदेश केव्हाही लागू होऊ शकतो. सर्व वित्तीय विशेषज्ञ या विषयावर काम करीत आहेत. लवकरच आम्ही 21 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे उच्चपदस्थ अधिकार्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेऊन सदरचा प्रस्ताव अंतिम स्वरूपात केंद्र शासनाकडे पाठवणार आहोत. यावर दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत निर्णय घेणे अपेक्षित आहे.
याप्रसंगी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रतिनिधी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष चीफ कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव श्री वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय सचिव श्री बहुगुणा, तमिळनाडूचे अध्यक्ष श्री बालाजी इत्यादी उपस्थित होते.
आता सर्व सेवानिवृत्तांना आशा आहे की केव्हा एकदा लवकरात लवकर पेन्शन वाढीचा निर्णय होऊन केव्हा एकदा पेन्शन मध्ये त्वरित वाढ होती त्याचा.

*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष , ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती, इंदापूर तालुका
मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे
मो.नं.9657220101



