आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*गांधी फोरम (राष्ट्रीय),सोलापूर शहर च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*

Spread the love

सोलापूर ३० – राष्ट्रीय गांधी फोरम, सोलापूर शहरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दि. ३० जानेवारी २०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकासमोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष प्रा. राहुल बोळकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात राज्य अध्यक्ष व माजी नगरसेवक उपेंद्र ठाकर यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे असे सांगितले. त्याकरिता बजेट मध्ये तात्काळ तरतुद करावे असे त्यांनी सांगितले आहे सोलापूर शहराध्यक्ष राहुल बोळकोटे यांनी २ ऑक्टोबर गांधी जयंती च्या आदी सोलापूर शहर गांधी फोरमच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती शितल तेली – उगले यांना निवेदन देऊन पुतळा परिसराला सुरक्षा व सुशोभीकरण करण्याची विनंती केली होती. आयुक्तांच्या आदेशान्वये दोन ऑक्टोबरच्या आधी पुतळा परिसरात सी.सी.टी.व्ही लावून किरकोळ डागडुजी करून देण्यात आली होती, त्याबद्दल त्यांनी आयुक्तांचे आभार मानले आहे. येत्या काही महिन्यात सोलापुरातून दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. त्यापैकी एक उड्डाणपूल रेल्वे स्टेशन मार्गे सात रस्त्याकडे जाणार आहे. सदर उड्डाणपूल होत असताना महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला धक्का न लावता पुलाचे काम करावे अशी विनंती लवकरच आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
गांधी फोरमचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत कोंडगुळे यांनी पुतळा परिसरातील कारंजा ताबडतोब सुरू करावे असे सुचवले आहे.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत कोंडगुळे, राज्य सचिव रमाकांत साळुंखे, शहर कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, सचिव प्रा. मोहनदास गुमते, खजिनदार बळीराम एडके, सहसचिव सुर्यकांत शिवशरण, कार्यकारणी सदस्य वेणूगोपळ शेट्टी इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!