आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*जि.प.नांदेडचा अजब कारभार* सुधीर ठोंबरे यांनी एकाच दिवशी सव्वा लाखाचे हार- तुरे खरेदी करून बिलांचे चेक स्वतःच्या नावावर घेतले…..!

Spread the love

नांदेड-( सखाराम कुलकर्णी )जिल्हा परिषद नांदेड चे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी जागतिक महिला दिनी चक्क एक लाख 17 हजार 174 रुपयांची हार- तुरे खरेदी केल्याचे दाखवून त्याची बारा बिल बनवली. व सर्व बिलांचे चेक स्वतःच्या नावाचे घेतले. याला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी मान्यता कशी दिली. इतक्या रुपयांच्या हारांचे काय केले, कोणाकोणाला घातले, याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये होऊन प्रत्येक जण तोंडात बोट घालत आहे.

नांदेडचे जिल्हा परिषद कार्यालय गैरकारभार करण्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. प्रत्येक विभागाचा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तव्यदक्ष, पारदर्शक असल्याचे प्रतिबिंब तयार करतात. पण गैर कारभार होऊन चव्हाट्यावर येत असतात, हे नाकारता येत नाही. माहितीच्या अधिकारात तत्कालीन उपमुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या कॉन्टिजन्सी खर्चाची माहिती घेतली असता बराच गोंधळ समोर येऊन जागतिक महिला दिन दि. 8-3-2022 चे हार- तुरे खरेदीचे प्रकरण समोर आले. दि.8-3- 2022 ला सुधीर ठोंबरे यांनी फ्लावर एन फ्लावर या दुकानातून 17 हजार 950 रुपयाची 21हार विकत घेऊन त्याचे बिल नंबर 624 व 629 आहेत .तर अजीम फ्लावर मर्चंट या दुकानातून 99 हजार 224 रुपयाची 252 हार व 250 तुरे विकत घेऊन त्याची दहा बिल बनवली. असे एकूण त्या दिवशी 273 हार व 250 तुरे एक लाख 17 हजार 174 रुपयांची खरेदी केली होती. फ्लावर एन फ्लावर या दुकानातून आणलेली हार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी आणली. तर अजीम फ्लावर मर्चंट या दुकानातून आणलेली 252हार 250 तुरे जि.प. अध्यक्ष यांच्यासाठी आणलीत, असा उल्लेख सुधीर ठोंबरे यांनी बिलाच्या अहवालात केला व या एक लाख 17 हजार 174 रुपयाची चेक स्वतःच्या नावावर बनवून घेतली

.मात्र बिलावर तारखा टाकायचे ठोंबरे विसरले.फ्लावर एन फ्लावर चे बिल नंबर 624 दिनांक 8/03/2022 आहे .त्यात दि. नऊ तारखेस पाच हार व दि. 11 तारखेस 2 हार खरेदीचा उल्लेख आहे. म्हणजे पुढील मालाचे बिल अगोदरच घेतले. बिल बनवण्याची किती ही विसंगती आहे. इतक्या हार- तुरे खरेदीची चर्चा जिल्हा परिषद मध्ये सुरू झाल्यावर सगळेजण तोंडात बोट घालून आश्चर्य व्यक्त करू लागले. तसेच इतक्या रकमेचे हार-तुरे खरेदी केल्याचे बिल पास करण्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी पण कसे मान्य केले. याचे पण सर्वांनाच नवल वाटून उलट सुलट चर्चा होत आहे. या फ्लावर मर्चंटची कोरी बिल बुकच सुधीर ठोंबरे यांनी आणून ठेवले की काय अशीही चर्चा होत आहे. व याचे स्पेशल ऑडिट व्हावे अशी मागणी जिल्हा परिषद मधील काही अधिकाऱ्याकडून गुप्तपणे होत आहे. अजून या दिवशीचा शाल खरेदीचा प्रकारही लवकरच सांगण्यात येईल. 1600 रुपयाची एक शाल खरेदी केली असे काही बिल असून त्याची सविस्तर बातमी पुढे येईलच. यातील काही बिलावरून असे दिसून येते की ठोंबरे यांनी काही दुकानाची बिले छापून ठेवली होती की काय असा संशय येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!