आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईपीएफओची पेन्शन वाढीबाबत असलेली उदासीनता, मिनिमम पेन्शन वाढीच्या निर्णयासाठी ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समिती करणार पुन्हा आंदोलन/उपोषण ……! कमांडर अशोक राऊत

Spread the love

भवानीनगर- : केंद्रीय मजूर मंत्री श्री भूपेंदर यादव यांनी मिनिमम पेन्शन वाढीचे ठोस आश्वासन दिले असले तरी ईपीएफओ ची उदासीनता, स्टॅंडिंग कमिटी ऑन लेबर च्या सन्माननीय 31 सदस्य व अन्य सदस्य यांची ईपीएस 95 पेन्शनर्स च्या चार सूत्री मागण्यांकडे वेळेवर विशेष ध्यान न देणे, तसेच पेन्शन वाढीसाठी आस लागून राहिलेल्या पेन्शनरचे मृत्यू व महत्वाचे म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ईपीएफओ विरोधात दिवसेंदिवस वाढत जाणारा रोष पाहता मिनिमम पेन्शनच्या त्वरित वाढीसाठी दिनांक 4 जानेवारी 2024 पासून सर्व तालुका,जिल्हा, प्रदेश व राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय संघर्ष समिती यांच्यामार्फत सभा, आंदोलने, मूक मोर्चे, घेराव ,रस्ता रोको व दिनांक 30 जानेवारी 2024 रोजीपासून जंतर-मंतर दिल्ली येथे साखळी उपोषण असा कार्यक्रम होणार असल्याचे ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत यांनी बुलढाणा मुख्यालय येथे सांगितले.

आपणाला माहितीच असेल की मिनिमम पेन्शन वाढीबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे तसेच केंद्रीय श्रम सचिव आरती आहुजा यांनी याबाबत उच्च पदस्थ अधिकारी यांची बैठक घेतली असल्याचे, संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार देखील सुरू झाला असल्याचे, तसेच दिनांक 1 सप्टेंबर 2014 च्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना देखील वास्तविक वेतनावर आधारित उच्चतम पेन्शनचा लाभ तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत मेडिकल सुविधा यावर देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जात असल्याचे आश्वासन केंद्रीय मजूर मंत्री भूपेंदर यादव यांनी हिंगोली महाराष्ट्र येथे झालेल्या ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व संघटनेचे पदाधिकारी यांचे दरम्यान झालेल्या चर्चेदरम्यान दिले होते.
दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर केंद्रीय मजूर मंत्री भूपेंदर यादव आले असताना राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे दरम्यानची मिनिमम पेन्शन वाढीबाबतची चर्चा अपुरी राहिली होती. दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी हिंगोली महाराष्ट्र येथे केंद्रीय मजूर मंत्री भूपेंदर यादव हे आले असताना त्यांच्याशी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिनिमम पेन्शन वाढीबाबत सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी बोलताना त्यांनी वरील आश्वासन दिले होते.
‌ ‌‌ मिनिमम पेन्शन रुपये 7500 अधिक महागाई भत्ता व कसलाही भेदभाव न करता सर्व निवृत्ती पेन्शन धारकांना वास्तविक वेतनावर उच्च पेन्शनचा लाभ त्याचबरोबर फ्री मेडिकल सुविधा या मुद्द्यांची याप्रसंगी चर्चा करण्यात आली होती.


आपणाला आठवतच असेल की दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर लाखोच्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शन वाढीबाबत आंदोलन करून निर्णय न झाल्याने दिनांक 8 डिसेंबर 2023 पासून रामलीला मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलना दरम्यान अनेक खासदारांनी आंदोलनाला भेट देऊन आपल्या मागण्या संबंधित मंत्र्यांना पोहोच केल्या जातील असे आश्वासन दिले होते तसेच काही खासदारांनी तर संसदेत याबाबत आवाज देखील उठवला होता. मथुरेच्या खासदार हेमामालिनी यांनी मध्यस्थी करून केंद्रीय मजूर मंत्री भूपेंदर यादव व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घडवून आणून यावर दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी आंदोलकांना भेटीसाठी बोलावून, केंद्रीय मजदूर मंत्री यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या निर्देशनानुसार श्रम सचिव आरती अहुजा यांच्याबरोबर बैठक होउन त्या बैठकीचा वृत्तांत केंद्रीय मजूर मंत्र्यांना कळविण्यात आला होता. त्यावर आपले पेन्शन वाढीबाबतचे काम लवकरच होणार असल्याचे आश्वासन देऊन त्यांचे विनंती वरून रामलीला मैदानावर चालू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते.
आता सर्व सेवानिवृत्तांना आशा आहे की कधी एकदाची लवकरात लवकर पेन्शन वाढीचा निर्णय होऊन पेन्शन मध्ये त्वरित वाढ होते ती.


*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष , ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती, इंदापूर तालुका
मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे
मो.नं.9657220101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!