आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*थायलंड येथे 20 डिसेंबर 23 ते 24 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रामणेर भिक्खू शिबिर व धम्मयात्रा*

Spread the love

सोलापूर दिनांक (प्रतिनिधी ):- गगन मलिक फाउंडेशन भारत आश्रय संस्था व त्रिरत्न सोसायटी यांच्या वतीनें येत्या २१ डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत 100 बौद्ध उपासकांची टीम थायलंडवर जात आहे .यामध्ये 47 श्रामणेर भिक्खूंसह भंतेगण व उपासकांचे सहभाग आहे .हे सर्वजण श्रामनेर भिक्खू शिबिरात व धम्म पदयात्रेत सहभागी होणार आहेत,अशी माहिती थायलंड दौऱ्यात सहभागी होणाऱ्या डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली .

डॉक्टर गायकवाड पुढे म्हणाले की युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार संकल्पनेतील बुद्धमय भारत घडविण्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते व धम्मदूत डॉक्टर गगन मलिक यांनी पुढाकार घेतला आहे थायलंडच्या बँकॉक शहरातून थायलंडचे राजे यांच्या रॉयल बुद्ध विहारातून धम्मपदयात्रा निघणार आहे .ही धम्मपदयात्रा श्रामणेर भिक्खूंना दीक्षा देऊन थायलंड येथील सावन पर्वत पर्यंत जाणार आहे.

डॉक्टर गगन मलिक फाउंडेशन च्या वतीने बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ निघणारी आंतरराष्ट्रीय धम्मयात्रा आहे .त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या परभणी पासून चैत्यभूमी दादर पर्यंत 580 किलोमीटर थायलंडच्या 110 बौद्ध भिक्षू समवेत काढण्यात आली होती. नागपूर दीक्षाभूमीपासून बौद्ध धम्मगुरु दलाई लामा यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू झालेली धम्मयात्रा धर्मशाळा मार्गे लडाख पर्यंत काढण्यात आली होती. डॉक्टर गगन मलिक फाउंडेशन च्या वतीने 84 हजार तथागत बुद्धाच्या मुर्त्या भारतभर विहारात पोहोचविण्याचा संकल्प डॉक्टर गगन मलिक यांनी केला आहे. रणजी खेळाडू व सुप्रसिद्ध आणि अभिनेते असलेले डॉक्टर मलिक हे तथागत बुद्धाची भूमिका केल्याने,बौद्ध विचारसरणीचे त्यांच्यावर प्रभाव पडल्याने त्यांनी श्रीलंकेचार संघराजाकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती या आंतरराष्ट्रीय श्रामनेर भिक्खू शिबिर व पदयात्रा यशस्वी करण्यासाठी गगन मलिक फाउंडेशन ची संचालक डॉक्टर मोहन वाकोडे, विकास तायडे, अमित वाघमारे हे प्रयत्नशील असून या धम्मदौऱ्यात सोलापुरातून सिनेअभिनेते व विपस्सना साधक डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड आणि विपस्सना साधक के एम कांबळे व भंते कश्यप हे सहभागी होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!