आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

UNBOX HORIZON उपक्रमध्ये वालचंद प्रथम.. रोटरी क्लब उत्तर सोलापूर यांच्या प्रयोजनाने UNBOX HORIZON विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन…..!

Spread the love

सोलापूर:- रोटरी क्लब उत्तर सोलापूर यांच्या प्रयोजनाने UNBOX HORIZON विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी मॉडर्न हायस्कूल सोलापूर येथे इयत्ता अकरावी आणि १२ च्या कला विज्ञान वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी सोलापुरातील विविध महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता. वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयातून कला शाखेसाठी जवळपास 200 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली तर विज्ञान विभागातून 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली सोलापुरातील महाविद्यालयामधून सर्वात जास्त विद्यार्थ्यांची नाव नोंदणी आणि उपस्थिती करिता वालचंद महाविद्यालयास रोख ३००० हजार रुपये बक्षीस प्राप्त झाले. तसेच कार्यक्रमादरम्यान कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्न आणि लकी ड्रॉ द्वारे २० विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी सर, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे सर, पर्यवेक्षक डॉ.जीवराज कस्तुरे सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सह समन्वयक श्री विजय वाघमोडे आणि श्री धनंजय जिडगीकर यांनी परिश्रम घेतले याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!