आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये वालचंद कॉलेजचे वर्चस्व*

Spread the love

सोलापूर:- दिनांक 16 व 17 डिसेंबर रोजी मार्कंडेय जलतरण तलाव सोलापूर येथे पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर महाविद्यालयीन जलतरण व डायव्हिंग स्पर्धेमध्ये वालचंद महाविद्यालयाच्या *कु. रक्षिता दोरणाल* हिने 50मी . ब्रेस्ट स्ट्रोक, 50मी.बॅकस्त्रोक,100 मी. बॅकस्ट्रोक सुवर्ण पदक प्राप्त केले तर 50मी. फ्री स्टाईल,200 मी. IM, 400मी.IM व 1 मी. स्प्रिंग डायविंग कांस्य पदक प्राप्त केले आणि 200 मी.बॅकस्ट्रोक चतुर्थ क्रमांक पटकावला. तर *चि. ईश्वर गड्डम* याने 400 मी.फ्री स्टाईल,200 मी.मिडले रीले वैयक्तिक IM प्रकारांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. तर 50मी.,100 मी .फ्री स्टाईल मध्ये रौप्य पदक प्राप्त केले.1 मी.डायविंग रौप्य पदक व हाईबोर्ड डायविंग मध्ये रौप्य पदक प्राप्त केले.सदर यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री.राहुल हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.

तर यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी, उपप्राचार्य वरिष्ठ विभाग डॉ.हिप्परगी,डॉ.राव ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अनुप म्हेत्रे,पर्यवेक्षक डॉ.जीवराज कस्तुरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!