अक्कलकोट हद्दीत 50 वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून अकस्मात मृत्यू……!
संपर्क साधण्याचे आवाहन....!
अक्कलकोट:-( प्रतिनिधी राजशेखर पवार) दिनांक 14सविस्तर बातमी असे कि अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील वागदरी हद्दीतील वागदरी ते आळंद जाणारे रोड वरील नंदकुमार कस्तुरचंद आगरखेड वय 55 वर्षे रा वागदरी ता अक्कलकोट यांचे शेतातील विहिरी मध्ये एक अनोळखी अंदाजे 40 ते 50 वर्षे वयाचा पुरुष जातीचा इसम हा अज्ञात कारणावरून नंदकुमार आगरखेड यांचे विहीरीत पडून बुडून मयत झाला आहे म्हणून वगैरे मजकूरच्या खबरी वरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे त अ. म. न 74/2023 फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 प्रमाणे दिनांक 9/12/2023 रोजी दाखल झाले आहे.
मयत देहाचे वर्णन
शरीर मध्यम, उंची 5 फूट 7 इंच, डोके जलंचर प्राण्याने कुरतडलेले, चेहरा जलचर प्राण्याने कुरतडलेले, छाती जलचर प्राण्याने कुरतडलेले, पोशाख बदामी रंगाचा शर्ट व निळे रंगाचे प्यांट, हात दोन्ही हाताची कातडी जलचर प्राण्याने कुरतडलेली, पाय दोन्ही पाय शाबूत असून दोन्ही पायाची कातडी जलचर प्राण्याने कुरतडलेली.
तरी वरील वर्णनाच्या अनोळखी मृत इसमाचे नाव ,पत्ताबाबत माहिती मिळाल्यास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे ता अक्कलकोट येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क नंबर 02181-220245
तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण मोबाईल नंबर 8308245910