आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ह.दे. प्रशालेतर्फे अभियंते, शास्त्रज्ञ उदय खांबेटे यांचा मानपत्र देऊन सत्कार!!

Spread the love

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर प्रशालेचे माजी विद्यार्थी,शास्त्रज्ञ, अभियंते उदय पुरुषोत्तम खांबेटे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संस्था गीत झाले. प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा अभियंता, शास्त्रज्ञ उदय पुरुषोत्तम खांबेटे यांचा शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते हरीभाई देवकरण प्रशाले तर्फे मानपत्र देऊन सत्कार केला तसेच विविध संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हणमंत मोतीबने व मारुती शहाणे यांचाही पालक शिक्षक संघाकडून उपाध्यक्ष अनिल जितुरी यांनी सत्कार केले.

यावेळी व्यासपीठावर प्रशाला मुख्याध्यापक प्रकाश कांबळे सर्व पर्यवेक्षक, दीपक खांबेटे,पालक संघाचे उपाध्यक्ष अनिल जितुरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक हणमंत मोतीबने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका दीपा फाटक यांनी सांगितला मानपत्राचे वाचन प्रशालेचे पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड यांनी केले.
माजी विद्यार्थी अभियंता शास्त्रज्ञ उदय खांबेटे यांनी शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या तसेच सर्व गुरुजनांचे अभार व्यक्त केले. चंद्रयान – 2 व 3 आणि आदित्य एल् 1 या मोहिमेत आलेले अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान दोन तास आवडीचा खेळ खेळून मोबाईलचा जास्तीत जास्त वापर आपले ज्ञान वाढवण्यासाठी करावा असे प्रतिपादन केले शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी आपल्या मनोगतातून उदय खांबेटे यांचे अभिनंदन केले.

मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी 105 वर्षाच्या वैभवशाली शैक्षणिक परंपरेत प्रशालेने आजपर्यंत अनेक तंत्रज्ञ, वैज्ञानिक, कायदेतज्ञ, डॉक्टर, उद्योगपती, शिक्षण तज्ञ, खेळाडू हरीभाई देवकरण प्रशालेने घडवले असून ते सर्वजण आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी शाळेतील विद्यार्थी करत आहेत याचा संस्थेला व प्रशालेला सार्थ अभिमानअसल्याचे प्रतिपादन करून श्री उदय खांबेटे यांनी चांद्रयान 3 या यशस्वी मोहिमेतील सहभागाबद्दल प्रशालेच्या लौकिकात भर घातल्याचे नमूद केले व श्री उदय खांबेटे यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देऊन शिक्षण प्रसारक मंडळी ही संस्था व हरिभाई देवकरण प्रशाला सदैव आपल्या पाठीशी असल्याचे मत व्यक्त केले.


संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा फाटक तर आभार लकण्णा कमळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!