*लातूर येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह व निवासी शाळेचे लोकार्पण*

लातूर (सखाराम कुलकर्णी मराठवाडा विभाग प्रमुख) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभुमीवर आज दि. १६ सप्टेंबर, २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली दोन वसतीगृह व एक निवासी शाळा १) मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, जळकोट जि.लातूर २) मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलीचे शासकीय वसतीगृह, अहमदपुर जि.लातुर ३) अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, लामजणा ता. औसा जि.लातुर यांचा लोकार्पण सोहळा मा.मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे, यांच्या हस्ते व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मंत्रीमंडळातील सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या दोन वसतीगृहांमुळे २०० विद्यार्थीनींची निवास व भोजनाची व्यवस्था झालेली आहे. तसेच निवासी शाळेमुळे २०० मुलांची शिक्षणाची व निवासाची व्यवस्था झालेली आहे. या तिनही इमारतीसाठी शासनाने २ हेक्टर २० आर जमिन उपलब्ध करुन दिलेली असून इमारत बांधकामासाठी रुपये २९.८६ कोटी इतका खर्च झालेला आहे.
या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री यांनी सामाजिक न्याय विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली त्यामध्ये शासकीय तसेच अनुदानित वसतीगृहाच्या माध्यमातून एकूण दीड लाख विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे नमुद केले तसेच परदेश शिष्यवृत्ती य विभागासाठी करण्यात येत असलेली तरतूद याचा उहापोह केला. विभाग मागासवर्गीय घटकांसाठी विविध योजना राबवित असल्याचे नमुद करुन विभागाचे सचिव सुमंत भांगे व विभागाच्या अधिका-यांचे अभिनंदन केले.



