*सणसरचे आझाद तरूण मंडळ गणनायक पुरस्काराने सन्मानित*

भवानीनगर : लोकमत पुणे व पुनीत बालन,उत्सव प्रमुख,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे प्रस्तुत आणि न्याती ग्रुप यांच्या सहयोगाने व गिरीश खत्री ग्रुप, काका हलवाई स्वीट सेंटर आणि प्रतिक ग्रुप प्रायोजकत्व असलेले यांचे संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्षा पासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागाच्या विकासात भरीव योगदान देत असणारे व वर्षानुवर्षे नेटाने काम करणाऱ्या गणेश मंडळांची सामाजिक कार्य लक्षात घेऊन व त्यांच्या समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार करून व सामाजिक परिवर्तन विषयक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या मंडळांना गणनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या सणसर येथील आझाद तरुण मंडळाचा समावेश आहे .
पुणे शहर ,जिल्हा व पिंपरी चिंचवड येथील विधायक काम करणाऱ्या गणेश मंडळांना शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी हॉटेल श्रेयस,डेक्कन,पुणे येथे *लोकमत गणनायक पुरस्कार* कसबा पुणेचे *आमदार श्री रवींद्र धंगेकर* व शिवाजीनगर चे *आमदार सिद्धार्थ शिरोळे* तसेच लोकमतचे *संपादक संजय आवटे* यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गणनायक पुरस्कार प्राप्त आझाद तरुण मंडळ हे वै.ह.भ.प. गणपतबुवा काळे महाराज यांच्या शुभहस्ते प्राण प्रतिष्ठापना झालेले व गेली चाळीस वर्षापासून समाजकार्यात अग्रेसर असणारे मंडळ असून सदरचे मंडळ हे गेले अनेक वर्षापासून सणसर व परीसर विकासात भरून योगदान देत आहे. आजपर्यंत मंडळाला महाराष्ट्र शासनाचे लोकमान्य महोत्सवांतर्गत तालुकास्तरावर रोख 25 हजार रुपये , सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र आणि वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गणराया अवॉर्ड सारखे पुरस्कार मिळालेले आहेत.
सणसर गावाला सन 2009-10 चा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे अंतर्गत स्पर्धेत रक्कम रुपये 10 लाखाचा पुरस्कार मिळवून देण्यात सदरचे मंडळाचा मोठा वाटा आहे. मंडळाचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश शिंदे यांची सन 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार पुरस्कार मिळण्यामध्ये व सन 2023 मध्ये मा. जिल्हाधिकारी सो, पुणे यांनी मंडळाचे सामाजिक कार्य पाहून केलेली विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड म्हणजेच मंडळाच्या कार्याचा एक प्रकारे सन्मानच आहे असे म्हणावे लागेल.
ग्रामीण भागातून इंदापूर तालुक्यातील गणनायक पुरस्कार मिळणारे एकमेव आझाद तरुण मंडळ असून मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



