* मुखेड तालुका उमरदरी संस्था अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या बेजबाबदारी पणामुळे शाळेवर जप्तीची नामुष्की*

नांदेड–(सखाराम कुलकर्णी)जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेच्या नरसिंह विद्यामंदिर महावीर सोसायटी नांदेड शाळेच्या जमिनीचा मूळ मालक महापालिकेच्या मावेजाची थकीत रक्कम दीड कोटीच्या वसुलीसाठी आज न्यायालयाने जप्तीसाठी पाठवलेल्या बेलीफला अध्यक्षांनी अडथळे आणून जप्ती होऊ दिली नाही. यावर बेलीफने न्यायालयात हा अहवाल दिल्या. यावर न्यायालय काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले मात्र संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या बेजबाबदारी पणामुळे शाळेवर जप्तीची नामकी आली. अशी शिक्षक वर्गात चर्चा होत होती.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेने नांदेड महानगरपालिकेकडून महावीर सोसायटीत जवळपास पाच एकर जागा 1985 ला शाळेसाठी घेतली होती. तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष कै. नागोराव जाधव यांनी त्या जागेवर नरसिंह विद्यामंदिर ही शाळा बांधली .पण त्यांच्या मृत्यूनंतर संस्थेचा कारभार शिवाजी जाधव यांनी हस्तगत केला. नंतर एक हाती सत्ता व मनमानी कारभार सुरू केला. शिवाजी जाधव यांनी अशा कारभार सुरू केल्यावर या महावीर सोसायटीतील नरसिंह विद्यामंदिर इमारतीचा महापालिकेच्या जागेचा मावेजा दिला नाही व मालमत्ता करही अध्याप भरला नाही. शासनाकडून आलेले इमारत भाडे व इतर निधी स्वतःच गिळंकृत करत राहिले. यामुळे महापालिकेची थकबाकी वाढत जाऊन कोट्यावधीवर गेली मालमत्ता कर साडेतीन कोटी तर मावेजा दीड कोटीवर थकीत झाला सन 2013- 14 मध्ये महापालिकेने थकबाकीच्या वसुलीसाठी शाळेचे कार्यालय सील केले. त्यात शाळेचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे विद्यार्थिनी निर्गम, चेक बुक,हजरी पट असे आदी महत्वाची कागदपत्र होती. पण ही सर्व महत्त्वाची कागदपत्र त्या सिल असलेल्या कार्यालयाबाहेर आली कशी हे घोडबंगाल आहे. कारण ही महत्त्वाची कागदपत्र सील केलेले असले तरी शाळेचे सर्व कारभार व्यवस्थित चालू आहेत व हे सील कागदोपत्री आजही आहे. ही थकबाकीची वसुली करण्यास महापालिका जिल्हा न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने जप्तीचे आदेश काढले होते .त्यावर संस्था अध्यक्ष शिवाजी जाधव उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केले. पण उच्च न्यायालयाने ही एक वर्षांपूर्वी जप्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी आम्ही यातील जमीन विकून महापालिकेची थकबाकी भरूत असे सांगून चालढकल करत राहिले. शेवटी काल दिनांक 15 शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने नरसिंह विद्या मंदिर नांदेड येथे थकबाकीच्या वसुलीसाठी बेलीफ पाठवून जप्तीच्या कारवाईला सुरुवात करू लागले तर संस्था अध्यक्ष शिवाजी जाधव व काही शिक्षक यांनी वेगवेगळे कारण सांगून बेलीफ ला जप्तीला अडथळा आणत राहिले व न्यायालयाची वेळ संपेपर्यंत जप्ती होऊ दिली नाही. यावर बेलीफ हा अहवाल घेऊन न्यायालयात गेले पण वेळ झाल्यामुळे त्यावर न्यायालयाकडून पुढील कारवाई सोमवारी होऊ शकेल असे समजते.



