अक्कलकोट येथील ट्रामा सेंटर मधील अनाधिकृत भरती प्रक्रिया रद्द करा………! स्वामीनाथ हेगडे

अक्कलकोट:- (प्रतिनिधी राजेश पवार) दि.२२ अक्कलकोट येथील ट्रामा सेंटर येथे नव्याने व अनधिकृत पणे स्टाफची भरती रद्द करा अशी मागणी शिवसेना प्रणीत कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे यानी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे केली आहे.
अक्कलकोट ट्रामा सेटंर येथे नर्स, ड्रायव्हर कर्मचारी वर्ग यांची महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीच्या वतीने आर्थिक देवाणघेवाण करून अवैध भरती करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिकांचा विचार करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची जाहिरात लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात आली नाही. तरी नुकतेच भरती करण्यात आलेली प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा घेऊन सेवा भरती करण्यात यावे. अशी तक्रार स्थानिक जनतेनी केली आहे त्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी शिवसेना विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे तालुकाउपप्रमुख परशुराम जाधव महिलाअघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण शहरप्रमुख वैशाली हावनूर यानी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळेस असे कळाले की सदर भरती प्रक्रिया हि सबंधित वैधकीय अधिका-याना अंधारात ठेऊन केली आहे कर्मचा-याची शैक्षणिक पात्रता आहे का नाही हे सुध्दा वैधकीय अधिका-याना माहित नाही असे कळाले व कांही ठराविक कर्मचा-यानी आपल्याच नातेवाईकांना कंपनीशी आर्थिक व्यवहार करुन भरती केली आहे असे कळते तरी नव्याने भरती झालेल्या कर्मचा-यांची नियुक्ती रद्द करुन रितसर भरती करावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे असे हेगडे म्हणाले.



